एक वोट कि किमत तुम क्या जानो…’; केवळ एका मताने सरपंचपदाचा उमेदवार विजयी


वाशीम : लोकशाहीमध्ये मताला मोठी किंमत आहे. निवडणुकीत एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे. केवळ एका मतामुळे अनेक सरकारे जिंकली तर अनेकांचे सरकार कोसळल्याचे इतिहासात दाखले आहेत. असाच एक प्रकार वाशीम जिल्हयातील रिसोड तालुक्याच्या बोरखेडी ग्राम पंचायत निवडणुकीत घडला. येथील सरपंचपदाचे उमेदवार आघाव भिमराव गंगाराम यांना ४७१ तर वायभासे विश्वनाथ गोविंदराव यांना ४७२ मते मिळाली. केवळ एका मताने वायभासे यांना विजयी घोषीत करण्यात आले. यावरून ‘एक वोट कि किमत तुम क्या जानो….’ अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली होती.

जिल्हयातील २७८ ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. लोकशाहीत मताला प्रचंड मोठी ताकत आहे. अनेकदा एका मताने काय फरक पडणार म्हणून अनेकजन मतदानाकडे दुर्लक्ष करतात. रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथे मात्र केवळ एका मतामुळेच सरपंच निवडून आला तर दुसरऱ्याला एका पराभव पत्कारावा लागला.

बोरखेडी येथे सरपंचपदासाठी आघाव भिमराव गंगाराम, वायभासे विश्वनाथ गोविंदराव व जायभाये वैभव कुंडलीक सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी सरपंचपदाचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रभाग क्रमांक १ मध्ये अघाव भीमराव गंगाराम यांना १९१, जायभाये वैभव कुडलीक यांना १६२ तर वायभासे विश्वनाथ गोविंदराव २४१ मते पडली.

Post a Comment

Previous Post Next Post