ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या ऊर्जेचे सकारात्मक विकास करावा - माजी आमदार दीपक आत्राम



गुड्डीगुडम येथे व्हालीबाल सामन्याचे उदघाटन प्रसंगी आवाहन केले

गुड्डीगुडम :- ग्रामीण भागातील खेळाडूंनी जिद्द, चिकाटी व आत्म विश्वासाने वाटचाल करावी.आपल्या भागातील खेळाडूंमध्ये मोठी ऊर्जा आहे.त्या मुळे खेळाडूंनी या ऊर्जेचा सकारात्मक विकास करावा.शहरीभागाच्या तुलनेत या ठिकाणी सोयीसुविधाचा अभाव असला तरी त्या वर मात करत क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा व शरीराचे सर्वांगीण विकास साधावा असे माजी आमदार दीपक आत्राम यांनी 



  गुड्डीगुडम येथे जय शिवाजी स्पोर्टींग क्लब च्या वतीने भव्य खुला व्हालीबाल सामन्याचे स्पर्धा आयोजित केले यावेळी उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार होते.सहअध्यक्ष म्हणून तिमरम चे सरपंच सरोजा पेंदाम तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच प्रफुल नागुलवार,माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि. प. सदस्य सुनीता कुसनाके, माजी सरपंच महेश मडावी विशेष अतिथी म्हणून देवलमरी चे उपसरपंच हरीश गावडे, वेलगुरचे उपसरपंच उमेश मोहुर्ले, माजी उपसरपंच शशीकला पेंदाम,अहेरी चे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी उपसरपंच धर्मराज पोरतेट,माजी ग्रा. प. सदस्य सुधाकर आत्राम,प्रतिष्टीत नागरिक बापू गंगारेड्डीवार, जयराम सिडाम, अशोक सिडाम,वसंत सिडाम आदींनी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
 अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अजय कंकडालवार म्हणाले की, ग्रामीण भागात खेळाचे व्यासपीठ तयार होणे काळाची गरज आहे.खेळ खेळतांना खेळाचे नियम समजून घेणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. खेळाने आपले शरीराचे विकास साधून आपली जिवन उंचमय करा आणि आपल्याला कुठेही समस्या आले तर आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली. यावेळी माजी सभापती भास्कर तलांडे, उपसरपंच उमेश मोहुर्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बामनकर तर आभार प्रदर्शन राकेश सोयाम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी मंडळाचे संतोष भुजाडी सचिन आलाम,चेतन भुजाडी,गणेश गावतुरे, विकास गंगारेड्डीवार, चिरंजीव पल्ले,अच्युतराव सिडाम, मनीष भुजाडी, गणेश आत्राम, विलास भोयर,रोहित आलाम, सारय्या पेंदाम,सागर आत्राम, सुरज पेंदाम आदीं कार्यकर्ते सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post