जनता हायस्कूल खैरगांव येथे महामानव डाँ, आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ::

जनता हायस्कूल खैरगांव येथे महामानव डाँ, आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ::


राजेंद्र बागडे नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता.7

         स्थानिक जनता हायस्कूल खैरगांव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरीनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी जनता हायस्कूल शाळेच्या परिसरात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवादल एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा जनता हायस्कूल व कनिष्ठ एमसीव्हीसी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल साठोने होते. तर यांच्या प्रमुख उपस्थितीत डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पर्ण करण्यात आले. यावेळी शिवकृपा स्टार कान्वेंटच्या संचालिका सुषमा साठोने, शिक्षक विनायक देशभ्रतार, प्रदीप कुंभारे आदी उपस्थित होते प्राचार्य अनिल साठोने यांनी 6 डिसेंबर दिनी डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी शालेय विध्यार्थीची भाषने झाली. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन वैभव दातीर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post