पाच तरुणांनी नववीच्या विद्यार्थिनीचं अपहरण करुन तिच्यावर केला सामूहिक बलात्कार


राजस्थान:- चुरू जिल्ह्यात (Churu District) पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराचं मोठं प्रकरण समोर आलंय. चुरूच्या रतनगड पोलीस स्टेशन परिसरात पाच तरुणांनी नववीच्या विद्यार्थिनीचं (School Girl) अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.


मुलीच्या नातेवाइकांना तिच्या अपहरणाची माहिती मिळताच, त्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर विद्यार्थिनी विवस्त्र अवस्थेत जमिनीवर पडलेली कुटुंबीयांना आढळली. पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीये.



रतनगड स्टेशनचे प्रभारी सुभाष बिजारानिया यांनी सांगितलं की, 15 वर्षीय विद्यार्थिनीच्या काकांनी रतनगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी अहवालात नमूद केलं की, 'माझी भाची गावातील हायस्कूलमध्ये 9 वीमध्ये शिकते. 23 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणं घरातून सकाळी 9 वाजता शाळेत गेली. शाळा अर्धी संपली असताना दीडच्या सुमारास भाचीच्या मोठ्या भावाचा मुलगा घराकडं धावत आला. त्यानं काही लोक बहिणीला घेऊन गेले आहेत, असं सांगितलं. त्यानंतर आम्ही मुलीचा शोध सुरु केला. मात्र, भाची विवस्त्र अवस्थेत जमिनीवर पडलेली आम्हाला आढळून आली. तिच्यावर ते तरुण अत्याचार करत होते.'



आरोपींमध्ये गणेश हरिजन, कालू दरोगा, आदिल खान, नारायण सोनी आणि आणखी एक मुलगा होता. कुटुंबीयांना पाहताच आरोपी तेथून पळू लागले. मात्र, तीन आरोपींना पीडितेच्या काकांनी पकडलं. आरोपी आदिल आणि नारायण यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post