शेतकऱ्यांना प्रलंबित कांढळी सेवाग्राम रस्त्याच्या अधिग्रहित जमिनीचा मोबदला मिळावा "स्वराज्य संगठन आणि संघर्ष ऍग्रो ची मागणी



गेल्या अनेक वर्षांपासून कांढळी ते सेवाग्राम रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या निर्माण करिता अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रोड मध्ये गेल्या आहेत. त्याचा सर्वे झाला असून कित्येक ठिकाणी दोनदा मोजणी झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या हरकती आणि समस्या नोंदवून निपटारा देखील करण्यात आला. परंतु आज पर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. खरंगणा (गोडे), उमरा या गावातील पुलाचे काम सुद्धा त्यामुळे राखडले आहे. जमिनी पडीत राहल्या मूळे. आणि रस्ता उंच झाल्यामुळे देखील अनेक ठिकाणी पानी साचून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.२ ते ३ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा ना रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. ना शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या समस्याचे तात्काळ निवारण करण्याची  मागणी 14 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. तरी त्यांची मागणी समजून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी, स्वराज्य संगठन, आणि संघर्ष ऍग्रो ग्रुप करीत आहे. या करिता निवासी उपजिल्हाधिकारी मनोज कुमार खैरनार यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या शी सकारात्मक चर्चा झाली आणि समस्येचे लवकरात लवकर करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची सूचना त्यांनी केली. तसेच भू अभिलेख आणि भू संपादन विभागाच्या संबधित अधिकाऱ्याशी चर्चा करण्यात आली. त्यात त्यांनी लवकरात लवकर निपटारा होईल अशी अधिकृत माहिती दिली. या निवेदन ची प्रतिलिपी मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री साहेबाना देखील पाठविण्यात आली.या वेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून राजूभाऊ नखाते, निलेश पोथारे, दुर्गादास नागसीने, संघर्ष ऍग्रो चे राहुल मून, प्रशांत अवचट, स्वराज्य संगठन चे नंदू मून, आकाश सुखदेवे उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post