भाऊ मुलीला रस्त्यात I LOVE YOU म्हणू नको नाहीतर...

अकोला:- महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून अकोला येथे शाळेत जाणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला भररस्त्यात काढून तिला आय लव्ह यु म्हणणे हे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. शिर्ला अंधारे या ठिकाणचे हे दोन युवक असून त्यांनी या मुलीला छेड काढून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

उपलब्ध माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 2021 रोजी ही मुलगी सकाळी अकराच्या सुमारास शाळेत जात होती त्यावेळी आरोपी असलेला अक्षय भीमराव उमाळे ( वय 19 ) आणि मनीष गजानन गोपनारायण या दोघांनी तिचा रस्ता अडवला आणि तिला ‘ आय लव यू ‘ म्हटले. सदर प्रकारानंतर मुलगी घाबरून गेली आणि तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला त्यानंतर प्रकरण पोलिसात गेले. न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा डिसेंबर रोजी ठोठावण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post