प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (Smartphone) आहे, स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून कायमस्वरुपी हदद होणार आहे.


प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (Smartphone) आहे, स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून कायमस्वरुपी हदद होणार आहे.

पाहुयात स्मार्टफोन जगातून गायब का होईल ते. स्मार्टफोनशिवाय आपला दिवस सुरु होत नाही आणि संपतही नाही. माणसानं स्मार्टफोनमध्ये जग शोधलंय. घरगुती फोन, कॉडलेस, साध्या मोबाईलपासून सुरु झालेला प्रवास दोन दशकात स्मार्टफोनपर्यंत आलाय. पण आता हेच स्मार्टफोन जगातून कायमचे गायब होऊ शकतात. (nokia ceo and bill gates prdiction about smartphone)

भविष्यात स्मार्टफोनऐवजी माणसाच्या शरिरावरच सिमकार्ड आणि चिप लागणार आहेत. हे भाकित आम्ही वर्तवलं नाहीय तर चक्क नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्स यांनी हे वर्तवलंय. स्मार्टफोनचं भविष्य कसं असेल यावर चर्चासत्रात नोकियाचे सीईओ पेक्का लँडमार्क आणि मायस्क्रोसॉफ्टचे फाऊंडर बिल गेट्सनी काही भाकितं वर्तवली.

बिल गेट्सची काही भाकितं

बिल गेट्सनी केलेल्या काही भाकितानुसार, 2030 पर्यंत 6G टेक्नॉलॉजी आलेली असेल. स्मार्टफोनची जागा स्मार्टवॉच, स्मार्टग्लासेस घेतील. शरीरावर लागलेले इलेक्ट्रीक टॅटू स्मार्टफोनना रिप्लेस करू शकतात. शरीरात किंवा शरीरावर लागलेल्या चिपद्वारे स्मार्टफोनमधील फिचर्स मिळतील. सध्या न्यूरालिंक चिपचा प्रयोग माकडांवर सुरू आहे. न्यूरालिंक ब्रेन चिपद्वारे माकडं कम्प्युटरवर टाईपिंग करू शकतात. तेच तंत्रज्ञान मानवी शरीराच्या बाबतीत वापरलं जाईल. स्मार्टफोनमधील फिचर्स स्मार्टग्लासेस किंवा ब्रेनचिपमध्ये मिळतील. ही टेक्नोलॉजी युजर्सच्या शरीरातून माहिती गोळा करतील.

स्मार्टफोन हा माणसाच्या जगण्याचा एक भाग झालाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. अर्थात हा बदल व्हायला अजून 8 ते 10 वर्ष लागतील असा अंदाज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post