मोबाईलमुळे नागपुरात 12 वर्षीय मुलाचा गेला जीव; पालकांनो, मुलं मोबाईलमध्ये काय करता याकडे लक्ष द्या..*


📲 मोबाईलमध्ये पाहून तशीच कृती करण्याच्या प्रयत्नात आठवीत शिकत असलेल्या बारा वर्षीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी क्वॉर्टर परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घडली असून अग्रण्य सचिन बारापात्रे (वय 12. सोमवारी क्वॉर्टर) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे..

🗣️ प्राप्त माहितीनुसार, सचिन सुरेश बारापात्रे (वय 40) हे सोमवारी क्वॉर्टर परिसरात नानासाहेब राऊत यांच्या घरी भाड्याने राहतात. बुधवारी दुपारच्या सुमारास टेरेसवर अग्रण्य खेळायला गेला होता. दरम्यान, वडील काही कामानिमित्त बाहेर, तर आई घरकामात व्यस्त होती. काही वेळ अग्रण्यने पतंग उडविली. त्यानंतर तिथेच असलेल्या लाकडी शिडीवर तो आजूबाजूच्या नागरिकांना खेळताना दिसला. त्यानंतर टेरेसवर असलेल्या लाकडी शिडीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. ही माहिती त्यांनी घरमालक किशोर चिखले आणि अग्रण्यच्या आईला दिली. याची माहिती त्यांनी आईला दिली. त्यांनी अग्रण्यला खाली उतरविले. तसेच उपचारासाठी मेडिकल येथे घेऊन गेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

👉🏻 *पालकांनो, अशी घ्या काळजी* 

▪️मुले मोबाइलवर वारंवार काय पाहतात, याकडे लक्ष द्या.
▪️अनावश्यक ॲप डाउनलोड करत असतील तर समजावून सांगा.
▪️मुले मोबाइलवरील कशाचे अनुकरण करतात. याकडे लक्ष द्या.
▪️मुलांच्या वर्तनामध्ये काय बदल होतो, याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा.

Post a Comment

Previous Post Next Post