घर जावयाचा 16 वर्षीय मेहुणीवर होता डोळा, पळवून नेलं आणि केला बलात्कार...


Crime News : राजस्थानच्या आदिवासी भागातील डूंगरपूर जिल्ह्यात पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे चार मुलांच्या वडिलाने मजुरीच्या बहाण्याने अल्पवयीन मेहुणीला पळवून नेलं. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तो फरार झाला. आरोपी हा घर जावई आहे. पीडितेच्या वडिलांनी याबाबत जावयाविरोधात अपहरण आणि रेपचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अजून सापडला नाही.


पोलीस अधिकारी गोपालनाथ यांनी सांगितलं की, पीडिता 16 वर्षांची आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पीडितेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत सांगितलं की, त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न 30 वर्षीय उमेशचंद्र (बदललेलं नाव) सोबत झालं होतं. त्यांना चार मुले होती. जावई सुद्धा त्यांच्यात घरात राहत हता. तो गुजरातच्या मेहसाणामध्ये मजुरी करत होता. 2 जुलै 2022 ला जावई त्याच्या अल्पवयीन मेहुणीला मजुरीसाठी गुजरातला घेऊन गेला.


त्यानंतर जावई मेहुणीला घेऊन पळाला. त्याने त्याचा मोबाइलही बंद केला होता. परिवारातील लोक त्यांचा शोध घेत होते. पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. बऱ्याच दिवसांनी परिवारातील लोकांनी त्यांना शोधलं आणि घरी घेऊन गेले. विचारपूस केल्यावर मेहुणीने भाओजीच्या कृत्याबाबत सांगितलं. याचा खुलासा झाल्यावर जावई फरार झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलीने वडिलांसोबत जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली.

राजस्थानमध्ये अशा धक्कादायक घटना नेहमीच समोर येतात. रेप आणि गॅंगरेपच्या घटनाही देशात मोठ्या प्रमाणात होत असतात. रेपच्या 50 टक्के केसेसमध्ये नातेवाईकच आरोपी निघतात. नातेवाईकच अल्पवयीन मुलींना आपले शिकार बनवतात.

Post a Comment

Previous Post Next Post