टाटा मॅजिकने दिली ट्रॅक्टरला धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी


गडचीरोली:- सकाळच्या सुमारास सोमनुर वरून प्रवासी घेऊन सिरोंचा कडे येत असलेल्या टाटा मॅजिक वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज 28 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. श्रीनिवास कीर्ती (50) असे जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर, यातील आणखी चार जण गंभीर असून त्यांना पुढील उपाचारा साठी ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे हलविले आहे.


प्राप्त माहितीनुसार ए पी 15 टि व्ही 1375 क्रमांकाची टाटा मॅजिक वाहन सोमनुर येथून सिरोंचा कडे प्रवासी घेऊन निघाली होती. सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या लंबडपल्ली गावाजवळ येताच रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रॅक्टर ट्रॉली ला जबर धडक दिल्याने एकजण जागीच जागीच ठार झाला आहे. याची माहिती मिळताच तत्काळ रुग्णवाहिकेने सोरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यात हलविण्यात आले आहे.

सदर वाहन नेमकं कोणाची आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, सोमनुर येथून सिरोंचा कडे प्रवासी घेऊन येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात सिरोंचा तालुक्यातील सोमणुर, सोमनपल्ली, आसरअली येथील प्रवासी तसेच वाहन चालक असे पाच ते सहा जण असल्याची माहिती आहे.

सदर अपघात जगदलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील लंबडपल्ली गावाजवळ झाला असून याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून सर्वांना सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लगतच्या तेलंगाना राज्यात हलविले आहे. या घटनेची पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post