बिबट्याच्या हल्ल्यात 5 बोकड ठार तर 3 बोकड जखमी*

     चामोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मौजा रामाळा येथे दि.05/01/2023 रोजी रात्रोच्या वेळी श्री पोचूजी मल्ला जिगरवार यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या 17 मेंढ्यावर हल्ला करून 05 बोकडांना ठार केले व 03 बोकडांना जखमी केल्याची घटना घडलेली आहे. सकाळी वन विभागाचे वनाधिका-यांनी मोकास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला.सदर घटनेमुळे पोचू मल्ला जिगरवार यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. 
वन विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी या भागात वाघ व बिबट्याचे अस्तित्व दिसून येत परिसरातील नागरिकांनी रात्रोच्या वेळेस विनाकारण फिरणे टाळावे तसेच शेतावर जाताना सतर्कता बाळगावी असे जाहीर आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post