महिलांच्या शैक्षणिक जडणघडणीत साविञीबाईंचे योगदान मोलाचे - वनपाल रमेश घुटके यांचे प्रतिपादन



*वनपाल रमेश घुटके यांचे प्रतिपादन*

दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी गडचिरोली 7822082216
देसाईगंज-
स्ञी ही क्षणिक सुखाची पत्नी तर अनंत कालाची माता असली तरी तिला भोगवस्तु समजुन अनेक वर्षे गुलामीत जगण्यास भाग पाडण्यात आले होते.माञ साविञीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून स्ञियांना शिक्षणास प्रवृत्त करून स्ञी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानेच आजमितीस स्ञिया चुल व मुलापर्यंत मर्यादित न राहता राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारू शकल्यात.त्यामुळे महिलांच्या शैक्षणिक जडणघडणीत साविञीबाईंचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन वडसा वन विभागात कार्यरत वनपाल रमेश घुटके यांनी केले.
ते देसाईगंज येथील पदस्पर्शभुमी तथा दिक्षाभुमी येथील व्यासपिठावर सम्यक जागृत बौद्ध महिला समिती देसाईगंजच्या वतीने साविञीबाई फुले जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविता मेश्राम होत्या.प्रमुख अतिथी म्हणून समाज सेवक मारोती जांभुळकर,शामला राऊत,ममता जांभुळकर, संजय मेश्राम,फुलजेबा डांगे, यशोदा मेश्राम, रत्नमाला बडोले,विद्या लोखंडे,गायञी वाहाने,मंदा शिंपोलकर,वंदना सहारे,विना पाटिल,विद्या टेंभुर्णे,दुर्गा रंगारी,सुनिता नंदागवळी,प्रतिभा बडोले, पुरुषोत्तम बडोले,रश्मी गेडाम, ममता नंदेश्वर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
  पुढे बोलताना घुटके म्हणाले की शिक्षणाच्या बळावरच आजमितीस महिला आपले अस्तित्व सिद्ध करू शकल्या आहेत.समाज माध्यमातून,व्यासपिठावर आपले विचार व्यक्त करू लागल्या आहेत.समाजाच्या जडणघडणीत मौलिक भुमिका बजावू लागल्या आहेत.असे असताना तंञज्ञानाच्या युगात अद्यापही काही महिला अंधश्रद्धा, अंधभक्तीत गुरफटुन असल्याने यातुन केवळ शिक्षणच बाहेर काढु शकत असल्याने प्रत्येक स्ञीने शिक्षणाची कास धरणे गरजेचे असुन त्यातही उच्च शिक्षण घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते मारोती जांभुळकर यांनी केले.संचालन जयश्री लांजेवार तर आभार ममता जांभुळकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दिक्षाभुमीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post