दुचाकीच्या अपघातात मोहझरी येथील दोन तरुणाचे पायाचे मोडले हाड


मोहझरी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहझरी येथील दोन तरुण कुरखेडा तालुक्यातील गांगुली इथे मंडईला गेले होते. सदर तरुण गावाकडे 
वापस येत असताना सायंकाळच्या सुमारास कराडी- पाठनवाडा रस्त्यांच्या मधोमध त्यांच्या दुचाकीचा सायंकाळी 7.00 वा.भीषण अपघात झाला.



सदर अपघात झालेल्या मोहझरी येथील तरुणांचे नाव गणेश ( गोलू)सुधाकर भेंडारे (25) व एकनाथ नामदेव गुरनुले (35) असे आहेत. या अपघातात दोघांच्याही पायाला जबर मार बसल्यामुळे ते जखमी अवस्थेत तिथेच पडून होते.


ही माहिती नागरिकांना कळताच घटनास्थळी धाव घेतली व दोघांनाही तात्काळ आरमोरी येथील शासकीय दवाखान्यात हलवण्यात होते पण आताच मिळालेल्या माहितीनुसार गणेश सुधाकर भेंडारे,एकनाथ नामदेव गुरनुले या दोघांचाही
तरुणाच्या पायाला खूप मार आणि पायाचा हाड
चेंदामेंदा होऊन मोडल्यामुळे ब्रम्हपुरी येथील आस्था दवाखान्यात रेफर करण्यात आल्याची माहिती सुकाळा येथील माजी उपसरपंच भारत भैसारे यांनी दिली .

हा अपघात नेमका कश्यामुळे घडला याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post