राजाराम येथे लोहार समाज महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम


आजच्या युगात समाज संघटन काळाची गरज -ऍड. रुपाली गेडाम 

गडचिरोली :-म. रा. लोहार व तत्सम समाज महिला संघ शाखा राजाराम च्या वतीने राजाराम येथे लोहार समाज महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमिलन कार्यक्रम
अहेरी महिला संघ तालुकाध्यक्ष लक्ष्मी बावणे, सचिव सारिका मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम शाखेचे अध्यक्ष रेणुका बामनकर सचिव शोभा चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली राजाराम शाखेअंतर्गत येणाऱ्या नंदीगाव, गुड्डीगुडम, निमलगुडम, राजाराम, खांदला, कोडसेलगुडम येथील समाज महिला एकत्रित येऊन काल २० जानेवारी रोजी पार पडला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजाराम चे उपसरपंच सुरक्षा आकदर तर प्रमुख मार्गदर्शक ऍड. रुपाली गेडाम विशेष अतिथी म्हणून माजी सरपंच ज्योती जुमनाके, ग्रा.प. सदस्य सपना मारकवार, अनिता आलाम,बचत गटाचे मंगला आत्राम,महेश्वरी बत्तूलवार, अक्कूबाई बामनकर,शोभा चंदनखेडे उपस्थित होते.
कार्यक्रमात समाजाचे आराध्य दैवत प्रभु विश्वकर्मा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना दीपप्रज्वलन करून पुष्पहार वाहून पूजन करण्यात आले.


महिला या युगात पुरुषाच्या पाऊलावर पाऊल ठाकत सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली जागा निश्चित केली आहे. महिला अबला नसून सबला आहे.महिलांनी प्रत्येक क्षेत्रात समोर यायचं आहे. महिलांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. संसारात आपल्या पतीला मदतीचा हात द्यावा आणि सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा आजच्या युगात सामाजिक संघटन काळाची गरज आहे. हळदी कुंकू निमित्त ठेऊन आपले विचाराचे आदान प्रदान करावी, समस्या वर विचार मंथन करावी असे आवाहन ऍड. रुपाली गेडाम यांनी केले. या वेळी तालुकाध्यक्ष रेणुका बामनकर, माजी सरपंच ज्योती जुमनाके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.महिलांनी एकमेकांना हळद कुंकू लावून वानस्वरूपात भेटवस्तू देऊन तीळगूड वाटून आनंद व्यक्त केले यावेळी सरिता बामनकर, वंदना चंदनखेडे, शोभा बामनकर, सुगना बामनकर, संगीता बामनकर, लक्ष्मी कोसरे, जनाबाई बामनकर, वैष्णवी बामनकर, वैशाली मेश्राम, तनुश्री बामनकर, कांचन बामनकर, वनिता बामनकर, प्रिया बामनकर, पूजा बामनकर, शांता बामनकर, सविता बामनकर, वच्छला बामनकर,सह आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू बामनकर तर आभार प्रदर्शन पूजा बामनकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post