मोवाड येथे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त जाहीर व्याख्यान



 सोपानदादा कनेरकर यांच्या व्याख्यानातून नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला...

राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता. 21


      मोवाड येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त प्रसिद्ध विचारवंत कीर्तनकार ह.भ.प. सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान झाले. मोवाडवासी व इतर आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिकांनी एकच गर्दी करून या व्याख्यानाचा मनसोक्त आनंद लुटला पण तितकंच सोपानदादा च्या एका एका शब्दातून लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबता थांबेना ही अफाट लोकांची गर्दी मोवाड वासीयांना सोपानदादाच्या व्याख्यानातून पाहावयास मिळालं. 



यावेळी कोरोना काळात दोन वर्ष निस्वार्थ सेवा देणारे कोरोना योद्धा युवा वर्ग यांचा जाहीर सत्कार घेण्यात आला. इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. क्रीडा क्षेत्र, देश सेवा करण्यासाठी नुकतेच नोकरीवर लागलेले सैनिक व कला क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच शेती व्यवसायात चांगले उत्पादन घेणारे युवा शेतकरी, सैनिक मुलींच्या आई वडिलांचा सत्कार, दक्षता समितीचा सत्कार, यावेळी घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मोवाडचे डॉ गोपाल पालीवाल युवा वैज्ञानिक डायरेक्टर मधुमक्खिपालन वर्धा, स्वामी विवेकानंद समिती पदाधिकारी, प्रमुख व्याख्यानकर्ते सोपानदादा कनेरकर प्रसिद्ध विचारवंत कीर्तनकार यांनी महिलाना व युवा वर्गाना तसेच व्यसनाधीन तरुणांना, मुलींनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, युवा तरुणांनी देश प्रथम हि भूमिका ठेवावी, अशा अनेक विषयाच्या विचारावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद समिती , सिस्काम अभ्यासिका व संत तुकाराम महाराज समितीच्या युवा वर्गानी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशयस्वी रित्या पार पाडला. या कार्यक्रमाचे संचालन यश चाळीसगावकर तर आभार विधी बागडे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post