मुलांनी प्रेमाब्रिमाच्या भानगडीत पडू नये,प्रेम वगैरे काही नाही ते फक्त सेक्सचा आकर्षण आहे - राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला


लखनऊ:- बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ मोहिमेअंतर्गत इटावा येथे राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांनी वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावरच लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितले आहे. मुलांनी प्रेमा ब्रिमाच्या भानगडीत पडू नये. आपल्या शिक्षणावर लक्ष द्यावा. प्रेम वगैरे काही नाही ते फक्त सेक्सचा आकर्षण आहे. त्यापासून दूर राहण्याची गरज आहे. असे प्रतिभा शुक्ला म्हणाल्या. मुली नटून थटून घरातून निघाल्या तर समजून जा काही तरी गडबड आहे. त्यांना सांभाळण्याची गरज आहे. अशा सूचनाही शुक्ला यांनी केल्या. मात्र शुक्ला यांनी विद्यार्थ्यांसमोर ही धक्कादायक विधाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post