प्रजासत्ताक दिनी वृक्षमित्र महादेव अरखेल यांचा सत्कार



महाराष्ट्रभर ओळख असलेले वृक्षमित्र महादेव अरखेल


राजेंद्र बागडे 
नागपूर विभागीय प्रतिनिधी 

      स्थानिक ग्रामीण रुग्णालय नरखेड जिल्हा नागपूर अंतर्गत पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरिता सक्रिय असलेले नरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नागपूर जिल्ह्यात प्रसिद्धीत असलेले वृक्षमित्र देशाच्या हितासाठी सर्वात्तम कामगिरी करिता ग्रामीण रुग्णालय नरखेड द्वारा 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी ग्रामीण रुग्णालय नरखेड यांच्या वतीने वृक्षमित्र महादेव अरखेल यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र मध्ये त्याची ओळख निर्माण झाली आहे वृक्षप्रेमी महादेव अरखेल यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालय नरखेड वैद्यकीय अधीक्षक डाँ, मडावी मैडम, वैद्यकीय अधिकारी डाँ, सारंग बहुरुपे, डाँ, महंत , कर्मचारी नाडेकर, लांजेवार, व इतर आरोग्यसेविका, कर्मचारी, आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post