इलेक्टोरल बॉंड्सच्या माध्यमातून भाजपला केले मालामाल



२०२१-२२ या वर्षात भाजपला १ हजार ९१७.१२ कोटी तर कॉंग्रेसला मिळाले ५४१.२७ कोटी

इलेक्टोरल बॉंड्सच्या माध्यमातून भाजपला मालामाल केले असून २०२१-२२ या वर्षात भाजपला १ हजार ९१७.१२ कोटी तर कॉंग्रेसला ५४१.२७ कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.



गेल्या ७ वर्षांपासून भाजप निधी उभारणीत आघाडीवर असून २०२१-२२ या आर्थिक वर्षात भाजपला विविध ठिकाणहून एकूण १ हजार ९१७.१२ कोटी रुपये मिळाले. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. पक्षाच्या ऑडिट रिपोर्टनुसार, भारतीय जनता पक्षाला (भाजप) २०२१-२२ या आर्थिक वर्षात विविध ठिकाणहून एकूण १ हजार ९१७.१२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. ज्यामध्ये पक्षाला इलेक्टोरल बॉंड्सद्वारे १ हजार ०३३.७ कोटी रुपयांचे योगदान मिळाले. ज्यापैकी पक्षाने ८५४.४६ कोटी रुपये खर्च केले.



देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष कॉंग्रेसने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये आपला खर्च ४००.४१ कोटी रुपये आणि मिळकत ५४१.२७ कोटी रुपये दाखवली आहे. कॉंग्रेसने ३४७.९९ कोटी रुपयांचे अनुदान, देणगी आणि योगदान दाखवले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी तुलना केली तर कॉंग्रेस या बाबतीत खूपच मागे पडली आहे.



भारतीय कम्युनिस्ट पार्टीने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये २.८७ कोटी रुपये ठेवी आणि १.१८ कोटी रुपये खर्च दाखवला आहे. सीपीआय देशभरातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढवते. मात्र पक्ष सध्या कोणत्याही मोठ्या राज्यात सत्तेत नाही. निवडणूक आयोगाने मंगळवारी राजकीय पक्षांशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाचा वार्षिक अहवाल सार्वजनिक केला आहे. ज्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि कॉंग्रेस, हे तिघे देशातील ८ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांपैकी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post