अखेर मद्दीकुंठा येथे आरोग्य विभागाकडून शिबीराचे आयोजन... डेंगू बाधित रुग्णांची रक्त तपासणी व औषधोपचाराला सुरुवात....






डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे निवेदनाची आरोग्य विभागाकडून दखल....


रवि बारसागांडी प्रतिनिधी सिरोंचा




सिरोंचा-: तालुक्यातील मद्दिकुंठा या गावात गेल्या आठवड्याभरापासून प्रत्येक कुटुंबात डेंगुचा थैमान पसरलेले आहे, गावात भितीचे वातावरण निमार्ण झाली आहे,
रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्या ऐवजी रुंगा संख्या वाढत आहे, मद्दीकुंठा या गावात शासन आणि प्रशासनाकडून कोणतेच प्रकारचे आरोग्य विषयी दखल घेण्यात आली नाही, त्याकरिता माद्दीकुंठा गावातील नागरिकांनी तालुका पत्रकार संघटनेला आरोग्य समस्याची माहिती देताच संघटनेचे अध्यक्ष - सागर मूलकला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे बांधवांनी मद्दिकुंठा या गावात तत्काळ आरोग्य शिबिराचे आयोजन करून डेंगुचा थैमानला आळा घालण्याची मागणी निवेदनातून केली आहे,डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची मागणीची दखल घेत तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी - डाँक्टर कान्नके यांनी मद्दीकुंठा गावात आरोग्य तपासणी शिबीर लावण्यात आली आहे,
शिबिरात गावातील बाधित रुग्णाना मलेरिया, डेंगू ,इतर तपासणी करून उपचार करीत आहेत,आरोग्य चम्मूनी गावातील प्रत्येक घरात जाऊन घरातील कंटेनर सर्वेक्षण,तापाचे रुग्ण शोधण्याचे सर्वेक्षण सुरुवात केली आहे,या स्तुत्य कामाबद्दल मद्दीकुंठा गावातील नागरिकानी सिरोंचा येथील डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे आभार मानले आहे,

Post a Comment

Previous Post Next Post