भाऊ लग्नाची मुलगी आहे का ? आहे जी पण नोकरीवाला असेल तर देतो नाहीतर...


गडचिरोली :- हल्ली युवक वर्गांना लगीनघाई झाली असल्याने व रितिरिवाजाप्रमाणे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने कित्येक तरुण-युवक वयोमर्यादा ओलांडून 'बाबा लगीन' असे म्हणणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच चालले आहेत. अशातच कित्येक वढिलधारी माणसे म्हणतत् की, 'बाबारे कुठलीही मुलगी आण ! ... आम्ही तीला सून म्हणून स्वीकारुच' अशी केविलवाणी बाब निदर्शनास येऊ लागली आहे.

कोणतेही आई-वडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा जावा याकडे लक्ष घालीत असतात. मुलगा कसा असावा, काय करतो, शेती किती आहे व इतर गोष्टींचा पुरेपूर विचारविनिमय करूनच लग्नाची गाठ बांधली जाते. अशातच याला अपवाद म्हणून मुलींच्याही अपेक्षा वाढतच चालल्या असल्याने मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रेमप्रकरणे वाढून 'जे होणार ते बघितले जाणार' अशा भ्रमात युवक-युवती गेले असल्यानेच पळवून जाणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढून सर्वकाही गमावून बसले आहेत; तर कुणाचे संसार सुखी-समृद्ध आहेत.

पूर्वी मुलीचे वडील लग्नासाठी मुलगा शोधायला जायचे. मात्र आजची परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या घडीला लग्न करण्यासाठी मुलगा,मुलगी शोधायला निघाला असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे. इकडे वयोमर्यादा ओलांडूनही कित्तेकांचे विवाह होत नसल्याने मुलांकडील वढिलधारी म्हणतात की, 'बाबारे कुठलीही मुलगी घेऊन ये...! ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post