आनंद मुलांचा-सुगंध फुलांचा*



जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथे रंगारंग कार्यक्रम
      अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रंगारंग (स्नेहसंमेलन)कार्यक्रमाचे आयोजित मुख्याध्यापक पी एन जगझापे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष केशोरी ग्रामचे प्रथम नागरिक नंदकुमार गहाणे सरपंच हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीकांत घाटबांधे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया हे होते. कार्यक्रमाचे सह उद्घाटक प्रकाश गहाणे माजी अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद गोंदिया हे होते. दीप प्रज्वलक म्हणून घनश्याम धामट पंचायत समिती सदस्य, योगेश नाकाडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, तेजूकला गहाने माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्चनाताई राऊत माझी पंचायत समिती सदस्य हे होते.



 प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र काडगाये प्राचार्य नवोदय हायस्कूल केशोरी, संजय भांडारकर प्राचार्य डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल, प्रदीप खोब्रागडे केंद्रप्रमुख, शेख साहेब पीएसआय, रामू बनकर उपसरपंच, कैलास शेंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
 विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवत दमदार प्रदर्शन केले यात रेकॉर्डिंग डान्स, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, भारुड, बालगीते, जोगवा, आदिवासी नृत्य, नाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला पुरुष व महिलांची अफाट गर्दी जमली होती. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट आवाज येत होता. प्रत्येक नृत्यूनंतर प्रेक्षकांमधून *वा अप्रतिम* असा आवाज येत होता. प्रत्येक गीताला बक्षीसांचा वर्षाव होत होता.
           दुपारी भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात मंजुषाताई चंद्रिकापुरे, तेजूकला गहाणे माजी जि प सदस्य, वीणाताई ओझा, पारडे मॅडम,कंटाळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
  यानंतर महिलांच्या विविध स्पर्धा संगीत खुर्ची, गीत गायन, उखाणे घेण्यात आले. अनेक महिलांनी विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकली. विशेष करून पोलीस विभागाच्या महिला भगिनी यांनी सुद्धा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकली.
          विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या व त्यांना बक्षीस सुद्धा देण्यात आले.
         कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गीता बडोले, हेमंत पवनकर, पवन कुमार कोहळे, भावना नंदेश्वर, कैलास शेंडे, राज्यपाल चवरे, गुणेश काडगाये, जीविका शहारे, वन्स काडगाये, नलू मरसकोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व महिला सदस्य, माता पालक संघाच्या सर्व महिला सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post