आमचे देवही दारू पितात, काली मातेला तर..


मुंबई:- 
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळं अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. चाहत्यांसह सर्वच कलाकारांनी नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात केले. केतकीनेही नववर्षाच्या स्वागतानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरुन तिच्यावर नेटकऱ्यांनी बरीच टीका केली आहे.



काही महिन्यांपूर्वीच वादग्रस्त विधानामुळं केतकी चितळे वादात अडकली होती. तिच्याविरोधात पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यात आला होता. तसेच ती बरेच दिवस तुरुंगातही होती. आता पु्न्हा ती सोशल मीडिया पोस्टमुळं टीकेची धनी ठरलेली आहे. नववर्षाच्या स्वागताला तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओत तिच्या हातात दारूचा ग्लास दिसून आला. या पोस्टवर तिला फॉलो करणाऱ्या एका यूजरनं प्रश्न विचारला आणि तिच्यावर टीका केली. त्यावर तिनं उत्तर दिला, पण आपण काय उत्तर देतोय, याचं तिला भानच राहिलं नाही. आता या कॉमेंटवर ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नेटकऱ्यांच्या ती निशाण्यावर आली आहे.

केतकी चितळेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत तिने हातावर गोंदवलेला एक टॅटू दाखवला आहे. तसेच तिच्या हातात दारुचा ग्लास दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.

एक यूजर म्हणाला, 'मराठमोळी संस्कृती, नवीन वर्ष आणि आता..?' तर आणखी एक यूजरने म्हटले की, 'आमचं नवं वर्ष फक्त गुढीपाडवा, हिंदू धर्म खतरे में' नेटकऱ्यांच्या कमेंटवर उत्तर देत केतकी म्हणते, 'तुमचा जन्म कधीचा ?'


सोबतच आणखी एक युजर म्हणतो,'वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं..!' त्याच्या या प्रतिक्रियेवर केतकी भलतीच संतापली. ती यावर म्हणते, 'मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असतो. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही..स्वतः ची संस्कृती शिका, मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका.' केतकीच्या या उत्तरानंतर चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


तर आणखी एक यूजर म्हणतो, "तुम्ही काहीही करा.. दारू प्या नाहीतर.. असे जाहीर प्रदर्शन करून हा कुसंदेश समाजात फैलावू नका.. लोकांनी आपला आदर्श घ्यायला सुरू केला होता.. पण त्यावर तुम्ही दारू ओतली.. केतकीनं त्यावरही उत्तर दिलं आहे. “अनफॉलो केल्याबद्दल धन्यवाद, पोस्ट न कळणारे महामूर्ख लोकं नकोच फॉलोअर्स म्हणून”, असे तिने कॉमेंटमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post