मटक्याचा धंदा जोरात करा, पोलीसांचा आशीर्वाद नेहमीच आहे


खल्लार:- पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा उपराई येथे खुलेआम व राजरोस वरली मटक्याचा धंदा सुरु असुन यास खल्लार पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे उपराई येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

खल्लार पोलिस स्टेशनच्या हद्दीत उपराई येथील वरली मटक्याचा मालक हा सातेगाव येथील इसम असून सदर इसमाचे इतर ठिकाणीही वरली मटक्याचे धंदे चालू आहेत.

उपराई येथील वरली मटका बंद करण्यात यावा यासाठी गावातील नागरिक हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.हा धंदा सुरु करण्यास परवानगी कुणी दिली?व हा धंदा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? हे उपराई येथील नागरिकांना कळणे आवश्यक आहे.

खल्लार पोलिस स्टेशन मधील एका पोलिस कर्मचाऱ्यांची तक्रार सुध्दा नागरीक करणार आहेत.

उपराई येथील युवक,शाळकरी विद्यार्थी यांचे भविष्य धोक्यात असल्यामुळे हा‌ वरली मटक्याचा संबंधाने उपराई येथील युवक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post