रेगुंठा येथील डॉ.जगदीश वेन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानेत नोंद



स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत यांचे  नावाने प्रश्न 

 गडचिरोली :- जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील रेगुंठा गावातील डॉ.जगदीश वेंन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानेत नोंद झालं असून स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत यांचं नावाचे  प्रश्न येथ  असल्याने जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
डॉ.जगदीश वेन्नम यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मार्फत दिल्या जाणारे 'डॉक्टरेट अवार्ड'मिळविणारे गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम व्यक्ती असून त्यांना  युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टीच्या सर्व आवश्यकतांचे पालन केल्यामुळे आणि विद्यापीठाच्या सिनेटच्या प्राधिकरणाने याद्वारे डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीज (D.Hum) सामाजिक कार्य आणि मानविकीमध्ये विशेषज्ञ (Honoris Causa) हा पुरस्कार प्रदान केला आहे.  विविध क्षेत्रातून अनेक अवार्डनी सन्मानित करण्यात आले आहे.वेन्नम यांचे गाव रेगुंठा हे सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 65 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.जिल्ह्याच्या अगदी टोकावर व अतिदुर्गम, डोंगराड, नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख जातो .गावामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.पावसाळ्यात विजेची समस्या सतत निर्माण होत असते.पावसामुळे गावाचा संपर्क तुटला जातो तर कधी कोणती समस्या निर्माण होणार याचा थांगपत्ता लागत नाही.डॉ.जगदीश वेन्नम यांनी सर्वांवर मात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्यामुळेच सर्व कार्याची दखल घेऊन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्न तालिकेत  कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मार्फत दिले जाणारे 'डॉक्टरेट अवार्ड' मिळविणारे प्रथम व्यक्ती कोण? म्हणून स्थान मिळाले आहे.त्याचप्रमाणे एकता फाउंडेशन भारत कडून  आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी  महाराज पुरस्कार, मॅजिक बुक ऑफ इंडिया कडून  सेवा रत्न अवॉर्ड, सावित्री फुले,महात्मा ज्योती फुले अवॉर्ड,आता  पर्यंत त्यांना एकूण 23 पुरस्कार मिळालेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post