शेतकऱ्यांचे थकीत चुकारे जमा करावे :- प्रितम रामटेके उपाध्यक्ष अनु. जाती काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर..*



परिसरासह तालुक्यातील अनेक अदिवासी सेवा सहकारी संस्थामध्ये धान विकलेल्या शेतकरी बांधवांचे अजूनही चुकारे मिळाले नाही. ते चुकारे तातडीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी प्रितम रामटेके उपाध्यक्ष अनु. जाती काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर यांनी केली आहे.
     अर्जुनी मोरगांव तालुक्यात कार्यरत आदिवासी विविध सहकारी सेवा संस्थेत अनेक भागातील शेतकऱ्यांनी धान विक्री खूप दिवसांपासून केली आहे. सर्व प्रक्रिया होऊनही शेतकरी संस्था व बँकेच्या चकरा मारत चप्पल झिजवत आहे. पण या प्रकाराकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. आदिवासी विविध सहकारी संस्थेत धान विक्री केल्यावर या संस्थांवर आदिवासी विकास महामंडळाचे लक्ष नाही. ते कानाडोळा करतात व त्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही जमा झाले नाही, असे परिसरातील नागरिक बोलतात. 
महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काही विचारणा केली तर ते काही न सांगता बोलायला फुरसत नाही, असा प्रकार करतात..

Post a Comment

Previous Post Next Post