जुगार खेळणाऱ्या देसाईगंज पोलिसाची मुख्य आरोपीला अजूनही अटक नाही


हायप्रोफाईल जुगारातील मुख्य आरोपी मोकाट ? कारवाईत भेदभाव झाल्याची धुसफूस


देसाईगंज :- शहरात नववर्षाच्या स्वागताच्या (३१ डिसेंबर) रात्री देसाईगंज पोलिसांनी एका हायप्रोफाईल जुगारावर टाकलेल्या धाडीत नाममात्र रक्कम आणि दुचाकी वाहने पोलिसांच्या हाती लागली. यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या जुगारातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हातीच लागला नसल्याची चर्चा देसाईगंजमध्ये सुरू आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात भेदभाव झाल्याची धुसफूस दबक्या आवाजात सुरू असल्याने खरंच तो आरोपी पोलिसांना सापडला नाही, की पोलिसांच्या हाती तुरी देऊन तो सहीसलामत पसार झाला, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

देसाईगंज शहरातील लाखांदूर मार्गावरच्या जेजानी राईस मिललगत सुरू असलेल्या त्या जुगाराच्या अड्डयावर छापा टाकून देसाईगंज पोलिसांनी पाच जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये पाच आरोपींची नावे ठळकपणे नमूद असताना पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मात्र आरोपींची नावे वगळण्यात आली. त्यामुळे त्या आरोपींना पोलिसच पाठीशी घालत आहेत का? अशीही शंका निर्माण झाली आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्याची गरज आहे.

जुगार नेमका कुठे सुरु होता?

भर हिवाळ्यातील कुडकुडत्या रात्री जुगारासारखा अनधिकृत खेळ मोकळ्या जागेमध्ये लाईट लावून खेळला जाऊ शकतो का? जुगार खेळणायांची नावे पाहता त्या पाचही आरोपींना मिळून केवळ चार हजार रुपये मिळू शकतात का? घटनास्थळावरून मद्याच्या बाटल्या गायब करण्यात आल्या का? मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी घटनास्थळ बदलविले का? असे तांत्रिक प्रश्न या प्रकरणात उपस्थित होत आहेत.

पोलिसांकडून लपवलपवीचा का?

कोणत्याही मोठ्या कारवाईनंतर पोलीस आपली कामगिरी दाखवण्यासाठी स्वतः प्रेसनोट तयार करीत असते. मात्र या प्रकरणात माहिती विचारली असताना लपवालपवी केली जात असल्याने शंका उपस्थित होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post