जनता हायस्कूल खैरगांव येथे 50 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न

जनता हायस्कूल खैरगांव येथे 50 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न ::


मान्यवराच्या हस्ते थाटात उदघाटन
----------------------------------------राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता. 10


  जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खैरगांव येथे दिनांक 9 व 10 जानेवारी 2023 रोजी जनता हायस्कूल खैरगांव व पंचायत समिती तालुका विज्ञान मंडळ नरखेड द्वारा आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे 50 वे उदघाटन कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाँ, एस.एन.पुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ, निलेश वानखडे गटविकास अधिकारी प.स.नरखेड, पोलीस निरीक्षक नरखेड जयपालसिह गिरासे, विशालसिह गौर गटशिक्षणाधिकारी प.स.नरखेड, विजय कळसाईत अध्यक्ष तालुका विज्ञान मंडळ, प्रदीप जनबंधू शिक्षण विस्तार अधिकारी, जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खैरगांवचे प्राचार्य अनिल साठोने, स्टार कान्वेंटच्या संचालिका सुषमा साठोने, आदी मान्यवराच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. एन.सी.सी.विध्यार्थीनी मान्यवराना मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले.पाहुण्याच्या हस्ते थोर विज्ञान पिता अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.


       दि. 9 जानेवारी रोजी एकूण नरखेड तालुक्यातील 87 विध्यार्थीनी विज्ञान प्रदर्शनी मॉडेल सादर करण्यात आले तर 18 शाळेतील विध्यार्थीनी वक्तृव स्पर्धामध्ये सहभागी होऊन पर्यावरणाचा हास, स्वच्छता हिच सेवा, कोरोना एक माहामारी, या विविध विषयावर वक्तृव स्पर्धा घेण्यात आली. या दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमात विविध मान्यवरांनी विध्यार्थीना खेळाबद्दल, शिक्षण क्षेत्राबद्दल व विज्ञान मॉडेल बद्दल, मान्यवरानी मार्गदर्शन केले. विज्ञान मॉडेल, प्रश्नमंजुषा,वक्तृव स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे आलेल्या विध्यार्थीना बक्षीस शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरवविन्यात आले तर सर्व सहभागी विध्यार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले.स्नेहभोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सहा, शिक्षक, तथा पदाधिकारी तसेच जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खैरगांव, शिवकृपा स्टार कान्वेंट खैरगांव, शिक्षकेतर कर्मचारी,तालुक्यातील विध्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक वैभव दातीर तर आभार शिक्षक विजय कळसाईत यांनी मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post