आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे -टिप्स


----------------------------------
यश नशिबाने मिळत नाही व वैभव कधीच अपघाताने मिळत नाही. जे वैभवसंपन्न व यशस्वी झाले त्यांनी स्वतःला अधिक उत्पादनक्षम व प्रभावी बनवण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या. जर तुम्हाला आयुष्यात सुपर सक्सेस मिळवायचे असेल तर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सवयींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. मी तुम्हाला टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीमंत व यशस्वी व्हाल.

*१) गोल सेट करा व बाकी कचरा फेका :* ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका. ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा.

*२) दैनंदिन सवयी विकसित करा :* पैसा व यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम सवयी लावणे ही मूलभूत गरज आहे. यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये त्यांच्या दैनंदिन सवयी हाच फरक असतो. यश कोणाला सहज मिळत नसते, त्यासाठी खूप कष्ट, मेहनत, समर्पण व समृध्दीसाठी आवश्यक असणार्‍या सवयी लावणे महत्वाचे असते. उदा. सकाळी लवकर उठणे, डेली प्लॅन तयार करणे, सकस आहार, व्यायाम, ध्येय निश्चिती, टू डू लिस्ट बनवणे, वेळेस महत्व देणे, सर्व कामे वेळेवर पार पाडणे, वाचन करणे, हेतूपूर्वक जोखीम घेणे, नेटवर्किंग, संयम या सर्व सवयी यशस्वी व्यक्ती स्वतःला लावून घेतात.

*३) यश व्हीज्युअलाईझ करा :* यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.

*४) नेटवर्क विकसित करा :* समविचारी लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ.

*५) लवकर सुरुवात करा :* उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.

*६) जागा ठिकाण बदला :* चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते. प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

*७) माईंड रीड करा :* कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते.

*८) स्वतःशी प्रामाणिक रहा :* जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात.

*९) डिसीप्लीन मेंटेन करा :* शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येयi गाठण्यास मदत होते.

Post a Comment

Previous Post Next Post