रॅप गाण्याच्या माध्यमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान.. — विटंबणा करणाऱ्या विरुद्ध बीआरएसपी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केला गुन्हा दाखल


औरंगाबाद:- बीआरएसपी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद काबळे म्हणाले, आमचा बाप विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान-विटंबना कदापि सहन केल्या जाणार नाही हे मनुवादी जातीवादी पिलावळीने कायम लक्षात ठेवावं,सोशल मीडिया यूट्यूब,इंस्टाग्राम च्या माध्यमातून

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान विटंबना करणाऱ्या अलोक उपाध्य या जातीवादी मनुवादी पिलावळीच्या विरोधात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल केला आहे.कारण,बाबासाहेब आमचा बाप आमची अस्मिता आमचा अस्तित्व आहे

                          व्हिडियो
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना अपमान करणाऱ्यांना एक भीमसैनिक या नात्याने कदापि सोडणार नाही.तो राजकारणी असो,आमदार खासदार,मंत्री असो,कोणाचेही गैर केली जाणार नाही असा एकप्रकारे इशाराच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे. . 

      आरएसएसच्या पिलावळीने सावध व्हावे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर अपमान कराल हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही,शासन प्रशासनाने अलोक उपाध्याय व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व व्यक्तींवर कडक कारवाई करावी,या पाठीमागे कोण आहे,यांचं काय षडयंत्र आहे,लवकर उघडे करून वेळेत यांच्या नांग्या ठेचाव्यात.

        सदर घटने संदर्भात बहुजन समाजामध्ये संतापाची लाट आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाला गंभीरपणे घेऊन तात्काळ सर्व आरोपी अटक करवे. 

       आरोपींना अटक न केल्यास भविष्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भव्य मोठे जनआंदोलन निर्माण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही त्यांच्या द्वारा सुचित करण्यात आले.

    बहुजन आंबेडकरी समाजाने शांतता आणि सुव्यवस्था कायम अबाधित ठेवावी.आपण भारतीय संविधानाला मानणारे लोक आहोत.अशी अपेक्षा सुध्दा त्यांनी व्यक्त केली

Post a Comment

Previous Post Next Post