वाघाच्या हल्ल्यात बैल ठार





मिंडाळा:- ३० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली मुखरु सहारे हे नेहमीप्रमाणे ३० जानेवारी रोजी १० वाजता जेथवण आटपून घरची स्वमालकीची गुरे चरावयास सोडून ते घरी परत आले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला करून ठार केले. सायंकाळी ५ वाजता गुरे घरी परत न आल्याने. मात्र रात्र होऊन सुध्दा बैल हे घरी परत आल्यामुळे मुखरू सहारे गावातील इतरांनी मिळून रात्री ८ वाजता इतरत्र जाऊन शोध घेतला मात्र शोध लागला नाही.

३१ जानेवारी रोजी सकाळी शोधाशोध केली असता रेवनजी सुकारे यांच्या शेतशिवारात मुखरु सहारे यांच्या मृत बैलाचे प्रेत आढळले.परिसरात मागील काही दिवसांपासुन नरभक्षक वाघांची दहशत असुन दहशत माजवणारा वाघ अद्यापही मोकाटच आहे असा सवाल परिसरातील नागरिक करत असुन परिसरात दहशत कायम आहे.दहशत माजवणार्या वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे

Post a Comment

Previous Post Next Post