मोवाड येथील नगर परिषद शिवाजी महाविद्यालयात नॅक समितीची भेट


राजेंद्र बागडे                      
नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता.31

मोवाड नगर परिषदेद्वारा संचालित नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड, येथे दि. 30 व 31 जानेवारी 2023 ला राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद बेंगलोर येथील नॅक त्रिसदस्यीय तज्ञ समितीने भेट दिली. नॅकच्या त्रिसदस्यीय तज्ञ समितीमध्ये अध्यक्ष म्हणून निर्वान विद्यापीठ जयपूरचे (राजस्थान) कुलगुरु डॉ. अरविंद कुमार अग्रवाल, समन्वयक म्हणून शारदा विद्यापीठ नोयडा (उत्तर प्रदेश) येथील प्रोफेसर डॉ. मृदुल धारवाल, सदस्य म्हणून सी.एस.टी.इ.एस.एस.एस. एन कॉलेज हुकरी(कर्नाटक) येथील माजी प्राचार्य डॉ. सतीश कुमार गवती यांनी भेट देऊन या समितीने महाविद्यालयाच्या शैक्षिणक , गुणवत्ता, विकासात्मक, आणि संशोधनात्मक बाबीवर निरीक्षण मूल्यमापण केले. प्रथम प्राचार्य डॉ. किशोर झिलपे यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून आय.क्यु ए.सी समन्वयक डॉ. मंगला अंबाडकर व सहसमन्वयक प्रा. सुनील नारनवरे यांच्या सोबत चर्चा करुन मॅनेजमेन्ट मिटींग, पालक मिटींग, माजी विद्यार्थी मिटींग, विद्यार्थी मिटींग, कर्मचारी मिटींग घेऊन सर्व विभागाचे निरीक्षण करून मूल्यमापण केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या विकास समितीच्या अध्यक्षा न. प.मुख्याधिकारी पल्लवी राऊत, सदस्य इन्फाल कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी तसेच सदस्य रामेश्वर रंभाङ, मंगेश माळोदे, डॉ. रवी सोरते,डॉ सुनील सरोदे यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. किशोर झिलपे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात नॅक समन्वयक म्हणून डॉ. मंगला अंबाडकर सहसमन्वयक म्हणून प्रा. सुनील नारनवरे यांनी जबाबदारी पार पाडली डॉ. एन.डी बालपांडे, डॉ. मंगला अंबाडकर, डॉ. प्रज्ञा कामडी, डॉ. अशोक भक्ते, डॉ. सतीश जाधव, डॉ.प्रदीप गजभिये, प्रा. सुनील नारनवरे, डॉ. वसंत निनावे यांनी आपआपल्या विभागाची माहिती समितीला दिली. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी रवींद्र सोरते, निलेश चनकापूरे, ओमप्रकाश माऴोदे, प्रशांत ढोरे, नंदकिशोर बेले, राजू नवनागे, रवी गजबे यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले तसेच संगिता लाडुकर , संगिता कनिरे, जया मानेकर, मनोज खाजोने यांनी 
शार्ट टर्म कोर्सेस इन्स्ट्रकटर ची भूमिका पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post