लाच घेतली आणि ग्रामसेवकाने झेंडा फडकविला...


जळगाव :- माहिती अधिकारात मागितलेली सविस्तर माहिती देण्यासाठी ग्रामसेवकाने 3 हजार रुपयांची लाच मागितली

फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली व प्रजासत्ताक दिनी ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. Right to information 49 वर्षीय तक्रारदार धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील रहिवासी आहे. तक्रारदाराने गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत मधील वर्ष 2015 ते 2020 या कालावधीदरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबत माहिती मागण्याकरिता माहिती अधिकार अंतर्गत मागितली होती...

मात्र अर्जदाराला सदर माहिती वेळेवर मिळाली नाही, संपूर्ण माहिती सविस्तर हवी असल्यास त्यासाठी 3 हजार रुपये द्यावे लागतील असे ग्रामसेवक अनिल गायकवाड यांनी सांगितले. Acb trap तडजोडीअंती ही रक्कम अडीच हजार पर्यंत ठरली. फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी झाल्यावर प्रजासत्ताक दिनी सापळा रचण्यात आला, धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधू ढाबा येथे तक्रार दाराकडून अडीच हजार रुपये घेताना ग्रामसेवक अनिल गायकवाड यांना रंगेहात अटक करण्यात आली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षिक संजोग बच्छाव, पोलीस निरिक्षक एन. एन. जाधव, बाळू मराठे, ईश्वर धनगर, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post