साविञीमाईंच्या कर्तुत्वानेच स्ञियांची अवस्था बदलली - अशोक बोदेले यांचे प्रतिपादन

साविञीमाईंच्या कर्तुत्वानेच स्ञियांची अवस्था बदलली - अशोक बोदेले यांचे प्रतिपाद



देसाईगंज:- देशात स्ञिशिक्षणाचे महत्कार्य साविञीमाई व ज्योतिबा फुल्यांनी केले या कार्यामुळेच भारतिय समाजातिल स्ञियांची अवस्था बदलली असे प्रतिपादन अशोक बोदेले यांनी केले. संबोधी उपासक मंडळ देसाईगंज च्या वतिने संबोधी बुद्धविहारात आज साविञीमाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हनुण आंबेडकरी विचारवंत अशोक बोदेले प्रमुख अतिथी म्हनुण बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नागपुर प्रांतप्रमुख विजय बंन्सोड बौद्ध समाज कोअर कमेटी चे अध्यक्ष प्रकाश सांगोळे इंजि नरेश मेश्राम इंजि विजय मेश्राम डाकराम वाघमारे सागर वाढई आशाताई मिसार कल्पना कापसे उद्धवराव खोब्रागडे शेवंता बन्सोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करतांना अशोक बोदेले म्हणाले की देशात स्ञिशिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्यांनी केली प्रस्थापित समाज व्यवस्थेने स्ञियांना गुलाम बनवुन ठेवले होते हे जोखडदंड तोडुन स्ञियांना शिक्षित करण्याच्या कार्यासह त्यांना समाजातिल विविध क्षेञात कार्य करण्याची संधी या दाम्पत्यामुळेच मिळाली आज स्ञिया सर्वच क्षेञात भरारी घेतांना दिसतात साविञीमाईंना शिक्षणकार्य करतांना असंख्य अडचणिंचा सामना करावा लागला अपमान सहन करावा लागला पण त्यांनी आपले ध्येय सोडले नाही स्ञि शिक्षणासह समाज प्रबोधनाचे कार्य ही या दाम्पत्यांनी केले अजुनही स्ञियांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी संघर्षमय जिवन जगावे लागते साविञीमाईंच्या विचारांची कास धरुनच स्ञिया समाजात आपले स्थान प्राप्त करु शकतात असे प्रतिपादन अशोक बोदेले यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी विजय बंन्सोड आशाताई मिसार यांनीही साविञीमाईंच्या जिवनावर यथोचित मार्गदर्शन केले या प्रसंगी संबोधी उपासक मंडळाचे राजरतन मेश्राम कविता निरांजने टिना ठवरे निमा बागडे नानाजी कर्हाडे दिलीप इंदुरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन ममता रामटेके व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम बडोले यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post