ओबीसी तील विचारवंतानी एकत्र येऊन ओबीसी चा बँकअप कार्यक्रम ठरवावा -संतोष अलोणे



चिरोली:- महाराष्ट्र राज्यातील ओबीसी विचारवंतांनी एकत्र येऊन राज्यातील 272 ओबीसी जाती साठी बँकअप कार्यक्रम ठरवून ओबीसी साठी द्यावा असे आवाहन क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष संतोष अलोणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती प्रित्यर्थ क्रांतिबा सार्वजनिक वाचनालयात छोटेखांनी झालेल्या कार्यक्रमात केले
ते पुढे म्हणाले क्रांतिबा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातील 33 नियमाचा 33 प्रतिज्ञाच्या स्वरूपात ओबीसी चा बँकअप {सामाजिक } कार्यक्रम म्हणुन मान्यता दिल्यास ओबीसी चा बँकअप कार्यक्रम तयार होइल या ओबीसी च्या बँकअप कार्यक्रम मुळे महाराष्ट्रातील 272 जातीनी गमावलेली त्यांची अस्मिता त्यांना प्राप्त होइल महाराष्ट्र व तामिळनाडू तील ओबीसी चा बँकअप यांच्यात चर्चा घडवून आणुन देशातील 3741 ओबीसी जातिचा बँकअप कार्यक्रम तयार होऊन देशपातळीवर ओबीसी अस्मितेचा उदय होइल व या बँकअप कार्यक्रम मूळे ओबीसी चे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न सोडविण्यासाठी देशपातळीवरील आंदोलनाला बळ मिळेल
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा निकुरे तर सूत्रसंचालन सुनिल सोनुले यांनी केले व आभारप्रदर्शन विशाखा पुण्यप्रेडडीवर यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष निकुरे, राजेंद्र शिंदे, लीलाधर गुरुनुले, सारिका गदेकार अनिल गदेकार यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post