धानोरा तालुका शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन चा मेळावा व त्यानंतर मानधन वाढीसाठी सरकार विरोधात तीव्र निदर्शने.


दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी गडचिरोली
7822082216
धानोरा--गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500 रु तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तालुका मेळावा स्थानिक पंचायत समिती सभागृह मध्ये संपन्न झाले .
      यावेळी उदघाटक म्हणून संघटनेचे राज्य महासचिव कॉ विनोद झोडगे ,सह उदघाटक कॉ कॉ मंडपे कार्यक्रमा चे अधक्ष स्थानी कॉ कल्पना जम्बेवार,कॉ गीता बोमनवार,विमल करंगामी,माधुरी जेंगटे,वंदना दुग्गा यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


मेळाव्यात कर्मचाऱ्यांन च्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 24 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,मार्च पासूनचे थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी तसेच दिवाळी बोनस लागू करण्यात यावे आदी मागण्या विषही चर्चा करून 2023 हे वर्ष शापोआ कर्मचाऱ्यांनच्या मानधन वाढीचे असले पाहिजे असा निर्णय घेऊन येत्या फरवरी 2023 मधे दिल्ली संसद भवनावर विशाल धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती कॉ विनोद झोडगे यांनी दिली. 
पुढील 3 वर्षा साठी 21 लोकांची नवीन कार्यकारणी गठीत करून अधक्ष म्हणून कॉ कल्पना जम्बेवार,तर सचिव पदी कॉ विमल करंगामी आणि कार्याध्यक्ष म्हणून कॉ वंदना नरचुलवार यांची नियुक्ती करण्यात आली. 
मानधन वाढ व थकीत मानधन साठी सरकार विरोधात तीव्र नारेबाजी निदर्शने करण्यात आली यावेळी तालुक्यातील शेकडो शापोआ कर्मचारी उपस्थित होते.
मेळाव्याचे संचालन वंदना दुगा तर आभार माधुरी जेंगटे यांनी मानले.
    

Post a Comment

Previous Post Next Post