सापडली रे सापडली रेती तस्करी करणारी ट्रॅक्टर सापडली


कढोली:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील वाढोणा रेती घाटावरती 21/1/2023 रात्री साडेअकरा वाजता वन विभागाने रेतीची ट्रॅक्टर ताब्यात घेउन कारवाई केली.

संबंधित ट्रॅक्टर मालकाचे नाव प्रकाश रणदिवे असून हे नेहमी प्रमाणे वाढोणा रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास अवैध रेतीची वाहतूक करत होते. या घटनेची माहिती वन विभागाला प्राप्त होतात काल रात्र ठीक साडेअकरा वाजता वन विभागाने प्रकाश रणदिवे यांची ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे .

त्यामुळे या परिसरातील रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे .तरी अशा रेती तस्करावर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी महसूल विभाग तथा वन विभागाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post