संतापजनक.. महिलेने ६०० रुपयांचे उधार घेतले सामान, घरात घुसून वारंवार बलात्कार करू लागला दुकानदार

-
मध्य प्रदेश राज्यातील भोपाळमध्ये एका किराणा दुकानदाराकडून आपले ६०० रुपयांचे कर्जवसुली करण्याच्या बहाण्याने २६ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील एमपी नगर परिसरात एक व्यक्ति दारूच्या नशेत ६०० रुपयांचे कर्ज वसुली करण्याच्या बहाण्याने २६ वर्षीय एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला.
जेव्हा आरोपीने अनेक वेळा पीडितेवर बलात्कार करण्यासाठी दबाव टाकू लागला त्याला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठले व त्याच्या विरोधात एमपी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी म्हटले की, एमपी नगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ जानेवारी रोजी सकाळी व तिने जवळच्या किराणा माल दुकानातून ६०० रुपयांचे सामान उधार घेतले होते.महिलेने आरोपी दुकानदार जीतू याला सांगितले होते की, ती सामानाचे पैसे नंतर देईल.
रात्री दारूच्या नशेत धुंद होऊन तो महिलेच्या घरात घुसला व पैसे मागू लागला.

जेव्हा पीडितेने पैसे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा महिलेच्या घरात शिरून त्याने महिलेवर बलात्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post