जिद्द चिकाटी व एकसंघ होऊन खेळणे हाच विजयाचा मूलमंत्र - भाजपा प्रदेश सदस्य संदीप कोरेत*


गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील येमली येथे जय पहांडी पारी कूपार लींगो क्रीडा मंडळ च्या वतीने भव्य व्हॉलीबॉल सामन्याची प्रतियोगिता भरविण्यात आली त्या कार्यक्रमांचे उद्घाटक प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा नेता संदीप भाऊ कोरेत होते ते आपल्या आपल्या उद्घघाटनिय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलले की या व्हॉलीबॉल प्रतियोगिता प्रत्येक संग हा जिंकण्यासाठी येतो पण जिकतो एकटाच कारण जिंकासाठी पूर्ण एकसंघ होऊन आपल्यातला सर्वोत्तम खेळाचे योगदान टीम मधल्या सर्वांना द्यावे लागते तेव्हाच आपली टीम जिंकू सकते म्हनून येते भाग घेतलेल्या प्रत्येक चमूनी जिद्द, चिकाटी व एकसंघ होऊन खेळणे हाच विजयाचा मूलमंत्र आहे
येमली येथील गावातली क्रिडा मंडळ या पटांगणावर होणाऱ्या प्रतियोगेत पहिले बक्षीस २५, ००० हजार संदीप भाऊ कोरेत यांच्या तर्फे तर दुसरे बक्षीस २१००० हजार लायड मेटल एनर्जी लिमिटेड तर्फे तर तिसरे बक्षीस १०, ०००जिल्हा परिषद तथा विवेकानंद हायस्कूल शाळा येमली तर्फे देण्यात आले.



 कार्यक्रमाचे उद्घाटकप्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा नेता संदिप भाऊ कोरेत सह उद्घाटक झुरू दलू मडावी, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू हीचामि, उपाध्यक्ष विजय नल्लावर तालुकाध्यक्ष भाजपा,
प्रमुख अतिथी दोलत आत्राम शिक्षक व गावाचे प्रतिष्ठित नागरिक तसेच जय पहादी कुपार लिंगो क्रीडा मंडळाचे
अध्यक्ष ,रामा तूम्रेट्टी उपाध्यक्ष, बाजीराव हीचामी, बिछू हिचामी, अनिल गोटा , अजय गोटा उमेश मडावी व गावातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post