माणुसकी मिळवण्याकरीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव


••••••••••••••••••••••••••••••••••
१. *भीमा कोरेगावचा रणसंग्राम नेमका का आणि कश्यासाठी घडला?*
२. *त्यास जबाबदार कोण?*
३. *धर्माने आंधळे झालेले पेशवे ? की,
४. *पेशव्यांच्या बेबंद शाहीला पायबंद घालण्यास असमर्थ ठरलेले बहुजन मावळे ?* की,
५. *छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वैदिक मनुवाद्यानी केलेल्या अपमानाचा आणि हत्येचा बदला घेणारे ?* की,
६. *स्वतःच्या 'महार' जातिवर मनुवाद्यानी केलेल्या अमानुष अन्याय अत्याचाराचा बदला घेणारे आणि वैदिक मनुवादि पेशवाशाहीचा अस्त करणारे ते स्वाभिमानी ५०० महार सैनिक ?*

" हे तमाम प्रश्न ब्राह्मण इतर बहुजनां साठी तर
आहेतच" तसेच *मराठा, कुनबी, माळी, धनगर बहुजन शिक्षित उच्चशिक्षित अर्थात शुद्र-अतिक्षुद्र जातीच्या नविन तरूण पिढी करिता देखील आहे. बहुजन तरूण पिढी गेल्या अनेक वर्षांनंतर आज तरी आपल्या शूर पराक्रमी महापूरूषांचा खरा ईतिहास जाणुन घेणार आहेत की नाही?*

बहुजन मित्र हो!!


*काबूल पासून कलकत्या पर्यंत ज्याचे साम्राज्य पसरले होते तो औरंगजेब सात लाख सैन्य आणि 32 कोटीचा खजिना घेऊन संभाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी 27 वर्षाहून अधिक काळ दिल्लीची राजधानी सोडुन महाराष्ट्रात संघर्ष करीत होता.*

*ज्या वैदिक मनुवादि ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला व शेवटी विषप्रयोग करून शिवाजी महाराजांची हत्या केली. स्वराज्यावर संकट आलेले असताना ज्यांनी शिवाजी महाराजांच्या घरात गृहकलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच वैदिक मनुवादि ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी औरंगजेबा कडून मनुस्मृती च्या नियमाने ठार मारण्याची सुपरी घेतली.*

*१ फेब्रुवारी १६८९ संगमेश्वरला संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या ताब्यात देण्याचे ब्राह्मणी षडयंत्र यशस्वी झाले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना फक्त दोनच प्रश्न विचारले*

*"पहिला प्रश्न तुमचे खजिने, जडजवाहीर आणि संपत्ती कुठे आहे?*
*दुसरा प्रश्न माझ्या सरदारा पैकी कोण कोण तुम्हाला सामिल होते?*


*छत्रपती संभाजी महाराज्यांच्या हत्या वैदिकधर्म शास्त्र मनुस्मृती नुसार करण्यात आली सर्व प्रथम संभाजी महाराजांची जीभ कापण्यात आली नंतर त्यांच्ये डोळे काढण्यात आले. कनात शिसे ओतण्यात आले. अंगावरील चामडी सोलून काढण्यात आली.*

*ह्या सर्व यातना " सुचाता भार्गव नावाच्या भृगु वैदिकांने " शुद्रांना देण्यात येणार्या वैदिक धार्मिक आचारसंहितेच्या "मनुस्मृती" मध्ये आहेत. ब्रम्हसुत्रावरिल आपल्या भाष्यात शंकराचार्य म्हणतात ! जर शुद्रांनक "वेद उच्चारले तर त्याची जीभ कापावी. जर शुद्रंनी वेद वाचले तर त्यांचे डोळे फोडावे. जर शुद्रांनी वेद ऐकले तर त्यांच्या कानात शिसे ओतावे. जर शुद्रांने वेदाला स्पर्श केला तर शुद्राच्या अंगावरील चामडी सोलून काढावी*...
*जिभेचा छेद,डोळे फोडने, कानात शिसे ओतने, चामडी सोलने ह्या यातना देने अर्थात वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय मृत्यू दंड देणे.*

*संभाजी महाराजांचे तर संस्कृतवर प्रभुत्त्व होते. त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचले होते आणि त्यांनी "बुद्धभुषण" नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजी राजे जातीने कुनबी अर्थात शुद्र होते.*

*संभाजी महाराज जवळ जवळ १ महिना ११ दिवस औरंगजेबच्या कैदेत होते, ते ही मराठ्यांच्या महाराष्ट्रात,पुण्या जवळ भीमाकोरेगांव वढूबुद्रूक या ठिकाणी पण एक ही मराठा माळी कुनबी धनगर संभाजी महाराजांना सोडवण्याचे धाडस करू शकला नाही,*
इतकेच नव्हे तर जेव्हा *११ मार्च १६८९ औरंगजेबाच्या सरदारांनी संभाजी महाराजांची हत्या करून शरीराचे तुकडे- तुकडे केले तेव्हा त्यांच्या छिन्न विछिन्न देहाला अग्नी द्यायला एकही मराठा, कुणबी, तेली, माळी, धनगर, सोनार, कुंभार,अथवा कोणी ब्राह्मण पुढे आला नाही,*

*वडू गावाचा गणपत महार आणि वडू गावच्या महारानी संभाजी महाराजांचे शरीराच्या तुकड्यांना मुखाग्नी दिला. आज ही छत्रपती संभाजी महाराज्यांची समाधी वढू गावाच्या महार वतनाच्या जागेत आहे.*

हे बहुजनाच्या इतिहासाचे सत्य आहे आणि *अतिशय आश्चर्यचकित करणारे दुसरे सत्य म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर मोगलाई यायला हवी होती* (कारण औरंगजेब मोगल होता) *पण मोगलाई न येता पेशवाई कशी आली.?*

ह्या वरून हे सिद्ध होते की *संभाजी महाराजांच्या हत्ये मध्ये वैदिक ब्राह्मणी मनुवादयाचा हात होता*.

*संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर पुण्यात पेशवाईचा कारभार सुरु झाला तेंव्हा ज्या महार जाती ने संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले त्याचा बदला म्हणून पेशव्यांनी महार जातीला दिवसात गावातून फिरन्यावर बंदी घातली व गळ्यात गाडगे व कमरेला बोराटी लावण्याचा नियम बनवला. अशा प्रकारे महार जातीवर पेशव्यांनी अन्याय वाढवला तो ईतका वाढला की पेशव्याने महारांना पेशवाईत जगणे मुश्किल कले कारण महारांचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच सन्मानाने अंत्यसंस्कार केला.*

*शिवाजी महाराजांचा मावळामहार, पेशव्यांचा कर्दनकाळ का झाला ?*

*छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या काळापासुन हजारो महारांनी स्वराज्य शत्रू विरूध्द लढताना जे शौर्य गाजविले त्याबद्दल त्यांना देन्यात आलेल्या इनामी जमीनी,महार वतन, हडकी-हडवळा, सरदारकी, पाटीलकीच्या सनदी देन्यात आलेल्या होत्या त्याचे पुरावे आजहि सरकार दरबारी उपलब्ध आहेत.*

*१७१३ नंतर शाहुचा सेनापती धनाजी जाधवाचा मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथ याच्या कडे सेनाकर्तेपद व पेशवापद आले. १७२० पहिला बाजीरावाच्या मृत्यू नंतर १७३९ मध्ये पोर्तुगीज आणि पेशवे वसईच्या लढाईत चिमाजी अप्पाच्या संगत पराक्रमी तुकनाक महाराला कंढी,कडे, तोडे देऊन सन्मान केला.*

*१७९५ निजाम विरूध्द पेशवे ह्यांच्यातली "खर्ड्याच्या लढाईत परशुराम पटवर्धन व मराठा सरदार हिरोजी पाटणकर यांच्या खाद्यांला खांदा लावून लढलेला पराक्रमी महार सरदार शिदनाकाला सोन्याचे कडे देऊन त्याच्या शौर्याचा गौरव केला होता.*

*माधवराव पेशव्यांच्या काळात रायगडावर इंग्रजांनी हल्ला केला. रायगडाचा किल्ला रक्षक रायनाक महार व त्याचे शूर महार १५ दिवस शेवटचा महार शिल्लक असे पर्यंत इंग्रजा विरुद्ध लढला त्या रायनाक महाराची समाधी रायगडावर आजहि आहे.*

*१७४० नानासाहेब पेशवा आणि बाळाजीरावाच्या काळात पानिपताची लढाईत महार सरदार व महार सैनिक पेशव्यांच्या बाजुने आणि महमंदशहा अब्दलिच्या विरोधात जीवाची बाजी लावून शेवटच्या श्वासापर्यंत लढले.*
पंरतु पुढे जाऊन.......

*"त्याच महारांनी पेशवाई का संपवली ?*"

*संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पेशव्यांकडून विशेषतः दुसरा बाजीराव पेशव्यां कडून महारावर जो अमानवी अमानुष अन्याय आणि अत्याचार होत होते ते अन्याय अत्याचार पेशव्यांच्या कानावर घालवायास महार सरदार सिदनाक आपल्या निवडक सरदारांना घेऊन पेशव्यांना भेटायला गेला.*

*शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज्यांच्या मराठे शाहितला सरदार शिदनाक महार होता आणि यांचाच नातू शिदनाक महाराने खरड्याच्या लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवित पठाणांच्या तावडीत सापडलेल्या पेशवा सरदार भाऊ पटवर्धन याचे रक्षण करून लढाई हरणार्या पेशव्याना विजय मिळवून दिला होता असा हा शूर सरदार महार जातीतल्या अन्य सरदारास घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यास भेटून आम्ही महार सरदार तुमच्या बाजूने ब्रिटिशा विरुद्ध लढाईत उतरू इच्छितो, तुम्ही आम्ही सारे एकत्र येऊन ब्रिटिशाला हाकलून लावु, आम्हांला इंग्रजांच्या बाजूने लढायचे नाही, परन्तु माय बाप तुमच्या लष्करात आणि राज्यात आमच्या महार जातीवर जो अन्याय अत्याचार होत आहेत ते तुम्ही थांबवाल काय? आमच्या गळ्यातील मडके कंबरेचा झाडू, खांद्या वरची घोंगडी आणि हातातील घुंगराची काठी नष्ट करणार काय? आम्हांला माणसा सारखी वागणूक मिळणार काय? अशी माणुसकीची मागणी शिदनाकने पेशव्यांना केली.*

*काय मागितले शिदनाक महाराने ?*

*फक्त माणुसकी! पण शिवशाहीला आपली जागिरदारी समजणाऱ्या पेशवा बाजीरावाने तिरस्काराने जबाब दिला ! "सुईच्या अग्रावर थरथरत रहाणाऱ्या धुळीच्या कणा एव्हडी ही स्थान तुम्हां महारास माझ्या राज्यात रहाणार नाही, तुम्ही जरी आमच्या बाजूने लढला तरी ही तुम्हाला तुमच्या पायरी वरच राहावे लागेल."*
*बाजीराव पेशव्यांच उन्माद व घमेंडी उत्तराने शिदनाक महार व त्याच्या सरदाराची तळ पायाची आग मास्तकास भिडली,आपल्या तलवारी वर हात ठेवून शिदनाक म्हणाला ! पेशवे आज पासून आमच्या जीवन मरणाच्या सीमा आम्ही ठरवु, यतो आम्ही.*
*असा निर्वाणीचा इशारा देऊन महार सरदार पेशवे दरबारातून बाहेर पडले.*

*"एक तर मर अथवा मारून जग"*

*वैदिक मनुवादि ब्राह्मण पेशव्यांनी शूरमहारांचे शौर्य, पराक्रम आणि साहस नाकरले कारण ते अस्पृश्य होते परंतू जे स्पर्श करानारे होते त्यांना देखील पेशव्यांनी वैदिक ब्राह्मणी मनुवादि नियमानुसार वागवलं होतंच*
जसं,
*छत्रपती शिवाजीमहाराजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला.* 

*पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी संस्कृतवरती प्रभुत्व मिळविल्यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले.*

*पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले.*

*तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता तर पेशवे यज्ञ,याग,होम हवं,भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते.म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले.*

*छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवर आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या काबूत राहणार नाही, म्हणून छ.प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई मध्य रात्री प्रतापसिंह राजांना गुप्तहेरा पासून चोरून शिकवायची.*

*ज्यावेळेस कोरेगाव भीमा येथे युद्ध सुरू होते, तेंव्हा शिवाजीराजांचे अत्यंत तरुण वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज व राजपरिवाराला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने वासोटा किल्यावर नजरकैदेत अर्थात कैदेत ठेवले होते.* 
*छत्रपतींना कैदेत टाकणाऱ्या पेशव्याना पराभूत करून त्या पाचशे शुरावीरांनी खरे तर छत्रपतींच्या अपमानाचा बदलाच घेतला*
*पेशव्यांचा पराभव झाल्यानंतरच प्रतापसिंह महाराजांची सुटका झाली.*
छत्रपतींच्या रक्ताची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील? बहुजन हो याची कल्पना करा...

*पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील एका अंधाऱ्या किल्ल्यात डांबून हालहाल करून ठार मारले.*

*अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर पेशव्यांना खंडणी न देणार्या शेतकऱ्यांच्या लहान लहन मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचे, यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस आणि तालिबान्या प्रमाणेच पेशवे क्रूर, निर्दयी आणि पाताळयंत्री होते.*

*इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले.*

*वैदिक मनुवादि ब्राह्मणी पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकारच नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला. कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती.*

*सरदार शिदनाक जेव्हा अस्पृश्यावर होणारे अमानवी अमानुष अत्याचार थांबवा हेच पेशव्यांच्या कानावर घालावयास गेला असता, सरदार शिदनाक व त्याच्या महार सरदारांना पेशव्यां कडून झालेली अपमानास्पद वागणूक वार्या सारखी तमाम महार जातीला समजली. ब्रिटिशांच्या सैन्यातिल महार सैनिकांना पेशव्यांना धडा शिकविन्याची संधी दिनांक १ जानेवारी १८१८ साली चालून आली.*

*दुसरा बाजीराव पेशवा आपला सेनापती बापू गोखले सहित ३०००० घोड दल १३८०० पाय दल घेऊन पुण्यापासून ८ कोसावर असलेल्या भीमाकोरेगावला दिनांक ३० डिसेंबर १८१७ रोजी दाखल झाला, सदरची खबर पुण्याच्या बंदोबस्त सांभाळणाऱ्या कर्नल बार्टला समजली, परन्तु त्याच्या जवळ पुरेसे सैन्य बळ नसल्यामुळे त्याने शिरूर छावणीला "लाखोटा" पाठवुन मदत मागितली, कर्नल बार्टने पाठविलेला "लखोटा" लेफ्टनंट कर्नल फिल्समन ने वाचून या कामासाठी कार्य कुशल साहसी, हमखास विजय मिळवून देणारी ज्यामध्ये महार जातीचे सैनिक मोठ्या प्रमाणात आहे अशी कडवी सैन्य तुकडी, जे पेशव्याच्या सैन्यासी दोनहात करायला आसुसले होते हे गोऱ्या अधिकाऱ्यास चांगले ठाऊक होते, त्याने त्याच  "बॉंबे नेटिव्ह इन्फंट्री सेकण्ड बटालियन फर्स्ट रेजिमेंट" ची ताबडतोब निवड करून कॅप्टन स्टोनटनाला ५०० महार सैनिक २७० घोडेस्वार तोफा ओढणारी २५ माणसे आणि २ तोफा चालविणारे सैन्य दिले. ब्रिटिशांना महार सैन्याच्या पराक्रमा वर पूर्ण विश्वास होता महार मरतील पण पाठ दाखविणार नाहीत हे त्याला पक्के माहित होते.*

*महार सैनिक २५ किलो मीटरचा रात्रीचा प्रवास करून दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव या ठिकाणी पोचले, भीमा नदीच्या पैल तीरावर दुसरा बाजीराव जातीने ३०००० पेक्षा जास्त शस्त्र सज्ज फौजे सह युद्धास तयारच होता, त्याचा सरदार होता बापू गोखले.*

*१ जानेवारी सकाळी १० वाजता पेशव्यांनी आक्रमण केले, पेशव्यांच्या सेनापती बापू गोखलेला ब्रिटिशांच्या अल्प सैन्याची पुरेपूर कल्पना होती आणि स्वतःच्या बलाढ्य  सैन्या बद्दल फाजील आत्म विश्वासाच्या जोरावर त्याने चढाई केली, ५०० महार सैनिकांनी सतत ४ तास गोळ्यांचा पाऊस पाडून पेशवे सैनिकांची दाना दान उडवली, तर ब्रिटिश तोफ सांभाळणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्माने तोफांचा भडीमार करून विरोधी सैन्याचे प्रचंड नुकसान केले, स्वतः बाजीराव पेशवा तोफेच्या जबरदस्त मार्याने हादरला.* 

*बाजीराव पेशव्यांच्या सैन्याच्या होत असलेली वाताहत थांबविण्यासाठी सेनापती बापू गोखलेनी ब्रिटिश सैन्याच्या पिछाडीने भीमाकोरेगावात प्रवेश करून धर्मशाळा ताब्यात घेतली, परन्तु ती पुन्हा महार सैनिकांनी ताब्यात घेतली, दरम्यान पेशव्यांच्या सैन्याने तोफ चालविणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्मास एकटे गाठून त्याचे शीर धडपासून छाटून भाल्याच्या टोकावर नाचवत  "मारला... मारला... तोफ वाला मारला"असा उन्माद करीत भीमेचे पात्रं ओलांडून हात घाईवर आले, दरम्यान ब्रिटिश सैनिकांच्या गोळ्या सुद्धा संपल्या होत्या, त्याच बरोबर बाजीरावाच्या सैन्याने कोरेगावतील गडीवर कब्जा केला होता, तिथून जबरदस्त मारा सुरु होता.*

*पेशव्यांचा भडीमाराने ब्रिटिश अधिकारी भांबावून गेले, काही अधिकारी कॅप्टन स्टोनटनाला माघार घेण्यासाठी विनवण्या करू लागले, तेव्हा महार सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून कॅप्टन स्टोनटनाला निर्वाणीचा शब्दात सांगितले, ज्यांना जीवाची भीती आहे त्यांनी खुशाल रणातून माघार घ्यावी, परंतू आम्ही महार सैनिक पेशव्यां सोबत लढूनच मरू मात्र मरणा पूर्वी माघार घेणार नाही, महार सैन्याच्या दृढ निश्चयाने कॅप्टन स्टोननला बळ चढले आणि आता बंदुकी सोडून तलवारीला तलवारी भिडल्या, महार सैन्याने आपल्या कुशाग्र बुद्धीने वेग वेगळ्या लढाऊ रचना रचून बाजीरावाच्या सैन्यास जेरीस आणले, पोटात ना होते अन्न, ना पाणी पण समोर दिसत होता फक्त बाजीराव पेशवा ज्यांने महाराना माणुसकी नाकारली होती, महार सरदार सिदनाकचा अपमान केला होता.*

*एक तर मर अथवा मारून जग, असा त्या भीमाकोरेगावच्या महार सैनिकास त्याचे मन बजावीत होते, भीमेच्या पैल तिरा वरून जसा बाजीराव पेशवा युद्ध पाहत होता,तसाच आकाशातील सूर्य देखिल भीमाकोरेगावचे युद्ध पाहत होता. या आधीही सूर्याने अनेक युद्ध, अनेक लढाया पाहिल्या होत्या त्याने एका स्त्रीसाठी झालेले राम रावण युद्ध पहिले होते, सत्तेसाठी कौरव पांडवांना लढाईत मरताना व मारताना पहिले होते, परंतु हे युद्ध ना राजगादी साठी होते, ना स्वर्ग प्राप्तीसाठी होते, हे युद्ध होते माणूस म्हणून जगण्यासाठीचे, मान, सन्मान आणि स्वाभिमानाची अभूतपूर्व ही लढाई होती म्हणूनच पेशव्यांच्या सैन्यवर महारांचे वर्मी घाव पडत होते. महारांच्या मजबूत आणि दणकट हातातील तलवारीचे घाव झेलता झेलता पेशव्याची सेना मेटाकुटीस आली, लढाईचे पालटणारे स्वरूप आणि नूर बघून बाजीरावाने रणागणातून धूम ठोकली, बाजीरावाचे अनुकरण त्याच्या जीवावर आणि भरवश्यावर अवलंबून असलेल्या आणि जीवाची भीती असणाऱ्यांनी तात्काळ केले.*

*सेनापती बापू गोखल्यांच्या एकुलत्या एक पुत्र गोविंद बाबाची तुकडी बापाला अर्थात बापू गोखलेला युध्दात एकट्याला सोडून जिव वाचवून पळत सुटली, गोविंद बाबाची गाठ महार सैनिक सोन नाका बरोबर पडली,दोघांच्या तलवारी एकमेकांना भीडल्या,सोन नाकाला "महारांच्या गळ्यात मडक आणि कमरेचा झाडू दिसू लागला,महार सरदारांचा पेशव्यांनी केलेला अपमान सोन नाकाच्या डोळ्यासमोर उभा राहिला त्याच्या जबरदस्त तलवारीचा पहिलाच घाव गोविंद बाबाला चुकवता आला नाही, उजव्या अंगावर घाव झेलीत पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न असफल ठरला, सोन नाकाच्या दुसऱ्या घावासरशी गोविंद बाबा भीमेच्या किनाऱ्या वरील मातीत मिसळला, एक एक महार सैनिक ५६, ५६ पेशव्यांच्या सैनिकाला कापून काढीत होता(मराठीची एक म्हण••तुझ्या सारखे ५६ पाहिले) कारण पेशव्यांनी महारावर कलेले अन्याय अत्याचाराचा ते वीर महारसैनिक बदला घेत होते.*

*सेनापती बापू गोखले स्वतःचा तरणा ताठा एकुलता एक पुत्र युद्ध भूमीवर बेवारस टाकुन, रणभूमी सोडून बाजीरावाच्या मागे चालता झाला, युद्धाचा निकाल लागला होता,ज्या भीमा कोरेगावच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराज्याना वैदिकांच्या मनुस्मृती नुसार हाल हाल करून ठार मारण्यात आले होते, त्याचा बदला, त्याचा सुड संभाजीच्या मराठ्यांना जरी घेता आला नाही तरीही १००ते१२५ वर्षाच्या प्रतिक्षे नंतर अधर्माने माजलेल्या आणि वैदिक मनूच्या कायद्याने उन्मत पेशवाईचा शेवट मर्द महारांनी केला.*

डॉ, बाबासाहेब म्हणायचे !!
*आमचे पूर्वज नक्कीच मेष राशीचे नव्हते, ते सिंह राशीचे होते, याची जाण जर नादान बाजीरावास झाली असती तर, सरदार शिदनाकाची माणुसकीची मागणी बाजीरावाने मान्य केली असती तर... काय इंग्रज इथे १५० ते २०० वर्ष राज्य करू शकले असते?* 

तर बहुजन मित्र हो!!!
*आम्हाला आमच्या शुरपराक्रमी पूर्वजांचा सार्थ अभिमान आहे, पण गर्व नाही, आम्ही पेशव्यांना धडा शिकवला कारण त्यांनी शिवाजी महाराजांची शिवशाही नाकारली, भीमाकोरेगावचे युद्ध जरी अतुलनीय होते, ह्या लढाईत विजय झाला पण त्याचा आनंद मात्र नक्कीच नाही, कारण इथुनच ब्रिटिशांची सत्ता भारतावर प्रस्थापित झाली.*

*हा भारत देश बहुजनांचा आहे आणि आम्ही ह्या देशाचे प्रथमत: आणि अंतिमतः भारतीय आहोत*

म्हणूनच आम्ही म्हणतो...

*जर, संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर गुढी उभारून वैदिक मनुवादि ब्राह्मण पेशवाईच नविन वर्ष साजरा करतात*

*तर, 1 जानेवारीला झालेला पेशवाईचाअंत हा दिवस बहुजनांनी शौर्याचे प्रतिक म्हणून नविन वर्ष साजरा करावा*
•••••••••••••••••••••••••••
*mn sonawane pune*
•••••••••••••••••••••••••••

Post a Comment

Previous Post Next Post