अहेरी तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून रुग्णांना फळ व बिस्किटे वाटप करून पत्रकार दिन साजरा




रमेश बामनकर 
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

  अहेरी तालुक्यातील आलापल्ली आरोग्य वर्धीनी केंद्र येथे   महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाच्या वतीने  मराठी पत्रकार दिना निमित्त आरोग्य वर्धीनी केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अल्का उईके यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ व बिस्किटे वाटप करून पत्रकार दिवस साजरा करण्यात आले. 
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आजच्याच दिवशी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सूरु झाले होते मराठी पत्रकारितेची मुहूर्त मेढ रोवण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान पत्रकार कधीही विसरू शकणार नाही.


यावेळी अहेरी तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलींद खोंड, सचिव  अनिल गुरनूले पुर्व विदर्भ सहसंघटक श्रीधर दुग्गिरालापाटी उपाध्यक्ष अखिल कोलपाकवार,आसीफ पठाण कोषाध्यक्ष अमोल कोलपाकवार, सहसचिव रामू मादेशी, सदस्य प्रशांत ठेपाले, रमेश बामणकर, उमेश पेंड्याला,रफीक पठाण,  साईनाथ चंदनखेडे,विस्तारी गंगाधरीवार,ईसरार शेख आलापल्ली व्यापारी संघटना चे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांच्यासह  आरोग्य वर्धीनी केंद्रातील परिचारिका रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post