चक्क नवऱ्याची केली हिस्सेवाटणी


उत्तर प्रदेश:- घर किंवा शेतीवाडीची अथवा जंगम संपत्तीच्या हिस्से वाटणी बद्दल तुम्ही ऐकले असाल.पण नवऱ्याच्या हिस्से वाटणी ? ही बाब सगळ्यांसाठी नवीन अशीच म्हणावी लागेल . पण म्हणतात न की या जगात अशक्य असे काही नाही ! तसलाच हा प्रकार दिसतोय .

घटना युपी च्या मुरादाबद मधील आहे. पहिले पासून विवाहित पुरुषाने सन 2017 मध्ये दुसरे।लग्न केले. त्याने पहिल्या लग्नाची बाब दुसऱ्या पत्नीपासून लपवून ठेवली. पण पहिली पत्नी जेव्हा पतीच्या नकळत सासुरवाडीत गेली तेव्हा तिला सत्य परिस्थिती समजली. तिचा नवरा हा पहिले पासून विवाहित होता.आणि त्याला तीन अपत्ये देखील होती. तिने याबद्दल एसएसपी कडे तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी त्यांच्यात समेट घडवून आणली.

अशी झाली वाटणी – पोलिसांनी त्या व्यक्तीच्या दोन्ही बायकांमध्ये नवऱ्याची वाटणी केली.सोमवार , मंगळवार आणि बुधवारी नवरा पहिल्या बायको सोबत तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी नवरा दुसऱ्या बायको सोबत राहणार आहे. रविवारी मात्र त्याला स्वातंत्र राहणार आहे.या दिवशी तो त्याच्या मनात येईल त्या बायको सोबत राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post