सापडले रे सापडले पत्ते खेळणारे सापडले


देसाईगंज येथील आरामशीन चे मागे मोकळ्या जागेत कट पत्ता नावाचा जुगार 52 तास पत्त्याचे आधारे पैशाचे हारजितवर खेळत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन देसाईगंज येथील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे व पोस्टेतील स्टाफ मिळून व पंचा समक्ष सदर ठिकाणी रेड केली असता आरोपीच्या ताब्यातून नमूद खालील प्रमाणे वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोस्टला अपराध क्रमांक 0014/2023 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुना नोंद करण्यात आला.

1) आरोपीचे अंग झडती मध्ये मिळालेले एकूण 58,670/- रुपये

2) मोबाईल 8 नग, 97,000/- रुपये.

3) एकूण 05 दुचाकी वाहन असा एकूण 3,45,000/- ₹.

4) कार 01 नग अंदाजे किंमत 10,00000/- रु.

असा एकूण 15,00670/- ₹ मुद्देमाल मिळून आला.

आरोपी:- 1) प्रभाकर मुरारी चौधरी, 2) गोपाल सिताराम खेमका,

3) नरदेश अक्ररुसी डोंगरे, 4) गुलाब रामाजी मेश्राम , 5) सोषन निमायत सरकार ,6) संजय आसाराम बनसोड,

7) राजेश शालिग्राम नाकाडे,

8) गजानन लक्ष्मण भजनकर,

9) सुनील गंगारामजी कैदलवार असे सर्व रा. देसाईगंज.

यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे पोलीस स्टेशन देसाईगंज हे पाहत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post