दादासाहेब यांनी शून्यातुन विश्व निर्माण केले - माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम


अहेरीत दादासाहेब कन्नमवार जयंती उत्साहात साजरी


गडचिरोली :- राज्याचे द्वितीय मुख्यमंत्री मा.सा.उर्फ दादासाहेब कन्नमवार यांनी परिश्रम व संघर्षातुन अर्थात शून्यातुन विश्व निर्माण केले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
त्या कापेवार-बेलदार समाजाच्या वतीने अहेरी लगतच्या गड़अहेरी येथील समाज भवनाच्या भव्य पटांगणात मंगळवार 10 जानेवारी रोजी मा.सा.उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनी अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उदघाटन स्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम होते. तर व्यासपीठावर समाजाचे ज्येष्ठ नागरिक किष्टय्या उपलपवार, सा. बां. उपविभागीय अभियंता रविकिरण पारेल्लीवार, नंदाताई नामनवार, प्रमोद बेझलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित समाजाच्या उन्नतीसाठी झटले असून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आनण्यासाठी संघर्षमय परिश्रम व मेहनत घेतले. परंतु आज शासनाला त्यांच्या अनमोल कार्याचे विसर पडल्याचे दिसत असून त्यांच्या नावाचे परिपत्रक काढून शासकीय कार्यालयात जयंती दिन व नावीन्यपूर्ण उपक्रमे राबविन्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे भाग्यश्रीताई आत्राम यांनी आवर्जून सांगितले.
आणि कापेवार-बेलदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याचे व दादासाहेब कन्नमवार यांची प्रेरणा व आदर्श नजरेसमोर ठेऊन त्या दिशेने समाज बांधवांनी वाटचाल करण्याचे भाग्यश्रीताई आत्राम यांनी आवाहन करून यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
ततपुर्वी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा.उर्फ दादासाहेब कन्नमवार व समाजाचे दानवीर स्व.शंकरराव बेझलवार यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलित करून व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे विधिवत शुभारंभ केले
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगर सेवक अमोल मुक्कावार यांनी केले सूत्रसंचालन महेश मुक्कावार यांनी तर उपस्थितांचे आभार प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी मानले.
यावेळी कापेवार-बेलदार समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी युवक-युवती व महिलांनी परिश्रम घेतले.

         बॉक्स
*विविध उपक्रमे राबविले*
    राज्याचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनाचे ओचित्य साधुन समाजोपयोगी विविध उपक्रमे राबविन्यात आले यात पहिले सत्रात डॉ.स्नेहल मेकर्तिवार, डॉ. तिरुपती कोलावार यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी,  दूसरे सत्रात मा.सा.कन्नमवार जयंती महोत्सवावर व्याख्यान, तीसरे सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम व खास विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आले अहेरी पत्रकार संघटनेचे सचिव सुरेंद्र अलोणे यांच्या वतीने मूल्यांकन करण्यात आले.  नृत्य स्पर्धाही घेण्यात आले यात अश्विता मुक्कावार, डॉ.स्नेहल मेकर्तिवार यांच्या वतीने मूल्यांकन करण्यात आले.
    अखेरच्या सत्रात समाजातील उत्कृष्ट कार्य केलेल्या बांधवांचे सत्कार समारंभ व स्पर्धेत सहभागी  विजेत्यांना बक्षीस वितरण आणि समाजाच्या वतीने महाभोजन दान देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post