भाऊ आता टेंशन घेऊ नको... ग्रामपंचायत देणार साडी अन् बायको कोन देणार जी?

कोल्हापूर :- जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावने एक अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गावातील प्रत्येक लग्न होणाऱ्या मुलीचे गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादान करण्यात येणार आहे. यावेळी लग्नात प्रत्येक मुलीला माहेरची साडीही भेट दिली जाणार आहे. यातून ‘गाव तुझ्या पाठिशी आहे’ असा संदेश दिला जाणार आहे.

गुटखाबंदी, दारूबंदी, विधवा प्रथा बंदी अशा अनेक निर्णयानंतर गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावाने प्रत्येक मुलीचे ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नाला सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित राहून कन्यादान म्हणून माहेरची साडी देण्याचे निश्चित केले आहे. ‘गाव तुझ्या पाठिशी आहे’ हा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे.
ऐनापूर हे साधारणत: तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या गावाने त्याची अमंलबजावणी केली. या गावात अनेक वर्षापासून दारूबंदी आहे. विधवा प्रथा बंद करताना प्रत्येक विधवेस ग्रामपंचायतीच्या वतीने मनीमंगळसूत्र देण्यात आले. स्वातंत्र्यदिनी विधवा महिलांना सरपंच आणि उपसरपंच पदाचा मान देतानाच त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. विधवा झाल्यानंतर बांगड्या फोडण्याची प्रथाही बंद करण्यात आली

पुरोगामी विचार जोपासणाऱ्या या गावाची रविवारी ग्रामसभा झाली. यामध्ये मुलीच्या लग्नात ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादानाची साडी देण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. लग्नाला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून चांगली साडी देण्याचे ठरले. सासरी जाताना केवळ माहेरची माणसचं नव्हे तर संपूर्ण गाव पाठिशी असल्याचा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे. प्रभारी सरपंच इश्वर देसाई आणि ग्रामसेविका सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पंचवीस वर्षात अनेक पुरोगामी विचार जोपासणारे हे गाव आहे. आयएसओ मानांकन मिळणाऱ्या या ग्रामपंचायतीने कन्यादानाचा निर्णय घेत गावातील मुलींना निर्भय राहण्याचाच संदेश दिला आहे, असे गावातील नेते अॅड. सुरेश कुराडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post