स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन



अश्विन बोदेले
 प्रतिनिधी
 सुपरफास्ट बातमी

आरमोरी:- आरमोरी येथील स्थानिक पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पार पडले .
तीन दिवशीय कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन कलागुणांची उधळण केले. शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण करण्यात आले . पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला शाळेचे संस्था अध्यक्ष गोविंदराजन कवंडर, विभाग प्रमुख विजयालक्ष्मी कवंडर , मुख्याध्यापक केशवन कवंडर, उपमुख्याध्यापिका प्राथमिक यशोदा डाखोळे, मुख्याध्यापिका सुजाता मेहर यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 त्यानंतर सलग दोन दिवस नर्सरी ते इयत्ता दहावीच्या मुला मुलींनी देशभक्ती, विविधतेत एकता, अशा वेगवेगळ्या विषयावर नृत्य सादर केले. चिमुकल्यांनी रंगीबेरंगी पोशाखात आपल्या नृत्याद्वारे पालकांचे व सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक केशवन कवंडर यांनी केले. दरम्यान सुजाता मेहर व जितेंद्र बर्डे यांनी शाळेतील विविध उपक्रम व स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संचालन सिंधू मशाखेत्री यांनी केले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे संचालन जयश्री सोरते, रुपाली बडवाईक , माया सोयाम यांनी केले. तर आभार सपना शिडाम मॅडम यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post