निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा करते लष्करावर हल्ला बिहारचे सहकारमंत्री सुरेंद्र प्रसाद यादव यांचा आरोप


पाटणा : निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा लष्करावर हल्ला करते असा आरोप बिहारचे सहकारमंत्री सुरेंद्र प्रसाद यादव यांनी केला आहे.



सुरेंद्र प्रसाद यादव यांना विचारण्यात आले की, बिहारमध्ये भाजप काहीतरी मोठे काम करणार आहे. त्यावर सुरेंद्र यादव म्हणाले की, भाजप मोठे काय करणार. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपवर लष्करावर हल्ला करते. यावेळी आता कुठल्यातरी देशावर हल्ला केला जाईल. 



सुरेंद्र यादव यांनी पुलवामा हल्ल्याबाबत भाजपवर हातवारे करत वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असल्याचे पत्रकारांनी मंगळवारी सहकारमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की २०२४ मध्ये भाजपचा रेकॉर्ड स्पष्ट आहे, मी भाजपचे आव्हान स्वीकारतो. निवडणुका आल्या की भाजपा लष्करावर अधिक हल्ले करते. यावेळी कुठल्यातरी देशावर हल्ला होणार आहे असे वाटते.



त्याचवेळी, आरजेडीचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, भाजपा निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. गयाच्या बेलागंजमधून आठ वेळा आमदार राहिलेले सुरेंद्र यादव लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या जवळचे मानले जातात. 



१९९८ मध्ये खासदार असताना त्यांनी तत्कालीन उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हातातून महिला आरक्षण विधेयक हिसकावून घेत फाडून टाकले होते. सुरेंद्र यादव हे जनता दलाकडून दोन वेळा आणि राजदकडून पाच वेळा आमदार राहिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post