इथे करतात मुली(महिला ) सार्वजनिक ठिकाणी नंगानाच...

वणी : येथील प्रेमनगर रेड झोन परिसरातील देह विक्री करणाऱ्या महिला सार्वजनिक ठिकाणी येऊन अश्लील चाळे करत पुरुषांना मोहात अडकवण्याच्या नाद त्यांच्या अलंगट आला असून यासंदर्भात तिघीं विरुद्ध वणी पोलिसांनी कार्यवाही केली.

या परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिला चक्क सार्वजनिक ठिकाणी येत अंगाचे प्रदर्शन करत आपल्या मोहपाशात अडकविण्यासाठी पुरुषांना हातवारे करणे सुरू केल्यामुळे तिन महिला विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

आज दि.शनिवारी 28 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर हे 1 वाजता चे सुमारास रेड झोन (प्रेमनगर) येथे सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, महिला पोकों प्रगती काकडे यांचे सह गस्ती वर असतांना तीन देहविक्री व्यवसाय करणाऱ्या मादक महिलांनी सार्वजनिक ठिकाणी येऊन येजा करणाऱ्या इसमांना आपल्या अंगांचे प्रदर्शन मांडून अश्लीलरित्या हातवारे ईशारे करत चिल्लमचाल्ली करीत असतांना मिळून आल्या. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याचे संकेत लक्षात घेत त्यांचे विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम 7.8 नुसार कार्यवाही करून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रदिप शिरस्कर वणी, सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, महिला पोकों प्रगती काकडे यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post