विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालणा देण्यासाठीच स्नेहसंमेलन : आमदार कृष्णा गजबे*

*विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालणा देण्यासाठीच स्नेहसंमेलन : आमदार कृष्णा गजबे*


 कुरूड वार्ता
         विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी स्नेहसंम्मेलनाचे आयोजन केल्या जाते. त्यामुळे स्नेहसंम्मेलनाच्या निमित्तानं आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळते .या संधीचे सोनं करुन विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणाला वाव द्यावा कारण विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालणा देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्या जाते, असे मत आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले. ते कोकडी येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षिस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. 
            विनायक शिक्षण संस्था, विसोरा व्दारा संचालीत विनायक उच्च प्राथ. तथा धनंजय नाकाडे माध्य. आश्रम शाळा कोकडी चे स्नेहसंमेलन २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान विनायक उच्च प्राथ. आश्रम शाळा कोकडी संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद् घाटन सेवा निवृत्त प्राचार्य एस. एम. पठाण यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी विनायक शिक्षण संस्था विसोरा चे सचिव भैय्याजी नाकाडे होते. विशेष अतिथी म्हणून विनायक शिक्षण संस्था विसोरा चे अध्यक्ष तथा माजी कृषि सभापती नानाभाऊ नाकाडे , सरपंच केवळरामजी टिकले, उपसरपंच पुष्पलता खोब्रागडे, तथा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
                        तीन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, मनोरंजनात्मक स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, माता पालक मेळावा व रात्रो शालेय मुला-मुलींचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांच्या संचात तिन अंकी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला.
                दि.३१ रोजी बक्षिस वितरण आणि समारोपीय कार्यक्रमाला माजी न्यायधीश ज्ञानदेव परशुरामकर , विनायक शिक्षण संस्था विसोरा चे सचिव भैय्याजी नाकाडे,माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, नाना नाकाडे माजी कृषि सभापती , वनिता नाकाडे , रेखा नाकाडे , जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली , वामनराव सावसागडे, राजुभाऊ रासेकर, आनंदराव बन्सोड, आनंदराव कापगते, शैलेंद्र पोटूवार, गणेश रासेकर, छगन सेडमाके, कपिल बागडे,मनोज ढोरे पोलीस मित्र! सेवा निवृत्त प्राचार्य पी.जी.कावळे , पिंकू बावणे, डाॕ.चंद्रकांत नाकाडे , डाॕ.अनिल नाकाडे , संजय कोसे,क्षीतीज उके उपस्थित होते.
                कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज लंजे यांनी केले.प्रास्तविक माध्यमिक मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी तर आभार प्राथमिक मुख्याध्यापक श्रीकृष्ण भागडकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेह संम्मेलन प्रमुख कु. के. बि. सहारे, विद्यार्थी प्रतिनिधी गणेश डोंगरवार,आर. एम. कापगते विद्यार्थी प्रतिनिधी कु. दुर्गा सदाशिव सहारे,सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी तथा वस्तीगृह विभाग कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post