दशरथ पुत्राच्या भूमीत राम राज्याची गरज प्रवचनकार ह भ प गुरुवर्य बाॱगरे महाराज यांचे प्रतिपादन पहिल्याच दिवशी राम कथेला हजारों भक्तांची उपस्थिती




जोगीसाखरा - ऋषीमुनींना जन्मताच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते खरे ठरलं लहानपणापासूनच स्वभावाने शांत व दयाळु शुर योध्दा असलेल्या मर्यादा षुरुर्षोमाने जन सामान्याचे जीवनमानाला सर्वोत्तम स्थान देऊन सुखी आणि समृद्ध राज्याची निर्मिती केली सावत्र आईचे शब्दापोटी सीतेसह वनवास भोगुन धर्मकार्य केले आज जन्म देण्यार्या आईवडीलाना आश्रमात राहण्याचे आणि मागून खाण्याचे दुर्दैव आले आहे. जन्मदात्या आई-वडिलांचे मानसन्मान होण्यासाठी दशरथ पुत्र रामाच्या भूमीत राम राज्य निर्माण होण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रवचनकार ह प. गुरुवर्य बांगरे महाराज बालाघाट म प्र यांनी केले . ते येथील भागवत मंडळाचे वतीने 1ते 7 जानेवारी पर्यंत पुढे चालणार्या संगीतमय श्रीराम कथा प्रवचना दरम्यान बोलत होते. त्यांनी श्रीराम कथा कार्यक्रमाचे विधीवत ज्योत प्रज्लन केले यावेळी ह भ प सुधी कन्या ज्ञानेश्वरी भागवत प्रवचन कीर्तनकार दुर्गाताई देवी भागवतकार सुश्री वैशू दीदी राधे राधे संगीताचार्य मंडळाचे आस्तिक तेलंग रुपेश राऊत सोनू तलमले राकेश राऊत मंगल नाणे गुलशन ओके गजानन बोरकर तसेच भागवत सप्ताहाला बहु संख्य भाविक उपस्थित होते. विसवर्षा नंतर इथे पहिल्यांदाच संगीतमय श्रीराम कथा चे आयोजन केल्यामुळे हजारो भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला रोज सकाळी 5.ते30.6काकड आरती 630.ते730रामधुन .5ते6 हरिपाठ 8ते11 रामायन कथा प्रवचन होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post