विद्युत ग्राहकांनी विद्युत कामगारांना साथ द्यावी




विद्युत ग्राहकांनी विद्युत कामगारांना साथ द्यावी.
  

 इमानदार चौकीदाराने केंद्रातील सत्ता काबीज केल्या नंतर आपल्या मालकासाठी देशातील सर्व सरकारी सार्वजनिक उद्योग क्षेत्राच्या कंपन्या बेधडक गौतम अदानी,मुकेश अंबानी यांना विकण्याचा झपाटा लावला.त्याविरोधात सरकारी सार्वजनिक कंपन्यातील कामगारांनी सनदशीर मार्गाने मैदानात उतरून जन आंदोलन केले नाही.ज्या प्रमाणे देशातील कृषीविभागाच्या काळ्या कायद्या विरोधात फक्त शेतकऱ्यांनी जिद्दीने एक दीड वर्ष मैदानात उतरून जनआंदोलन केले.तरी त्यांची योग्य पद्धतीने दखल घेतल्या गेली नाही. प्रशासकीय यंत्रणा आणि न्यायालयाची यंत्रणा स्पेशल मालकासाठी काम करणाऱ्या चौकीदारा समोर पूर्णपणे शरण गेली.तरी शेतकऱ्यांनी संघर्ष सुरू ठेवा तेव्हा कुठे मालक व त्यांचे 303 चौकीदारासह मुख्य चौकीदाराला माघार घ्यावी लागली. हा एक ऐतिहासिक इतिहास लिहिला गेला.
     भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उद्योग धंदा रेल्वे,यांच रेल्वे स्टेशनचे प्लॉटफॉर्म, जागे सह,मेल,एक्सप्रेस गाड्या विकल्या गेले.पण त्या विरोधात कामगार संघटनांनी त्यांच्या राष्ट्रीय ट्रेड युनियन ठोस देशव्यापी जन आंदोलन उभारलेले नाही.कारण या सर्व ट्रेड युनियनचे नेतृत्व मनुवादी विचारांचे समर्थक आहेत.त्यामुळेच त्यानी केंद्र सरकारच्या विरोधात म्हणजेच आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या निर्णया विरोधात कातडी बचाव धोरण स्वीकारून देशभरातील कामगारांना संघटीत करून जन आंदोलन उभारले नाही.ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन झाले तसेच रेल्वे च्या कामगारांचे,ओ.एन.जी.सी,एयरपोर्ट,अनेक सरकारी सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण केल्यामुळे या सर्व कामगारांनी एकजुटीने जन आंदोलन उभारणे आवश्यक असतांना केले नाही.त्यामुळेच देशभक्त चौकीदार आणि त्यांच्या मालकाची हिंमत वाढली.ते आता देशातील सर्वात महत्वाच्या विद्युत निर्मिती, वितरण यंत्रणा हाती घेण्याच्या मागे लागले आहेत.म्हणूनच विद्युत ग्राहकांनी विद्युत कामगारांना साथ द्यावी.कारण कामगारांपेक्षा ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.आज कामगारांना साथ दिली नाही तर उद्या न्याय मागण्याचा अधिकार सुद्धा राहणार नाही.  
    विद्युत ग्राहकांनी विद्युत कामगारांना साथ द्यावी.यासाठी सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत.पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत .कारण 4,5,6 जानेवारी 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही.कामगारांना काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा कामगारांचा विरोध आहे. म्हणूनच नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. काही कटकारस्थान करून कामगारांना बदनाम केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण दलाल,कमिशन एजेंट मोठ्या प्रमाणात संधी शोधात असतात.कंत्राटी कामगाराचा वापर करून या संपाला सुरुंग लावण्याची काम केल्या जाईल.म्हणूनच आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे.उदा BSNL बुडण्यापूर्वी JIO फुकटात आजीवन सिम,जास्त स्पीडचा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीडचा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात.उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत.त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत.त्याला उघड उघड मनुवादी विचारांच्या राजकीय पक्षाचे समर्थन आहेच.त्यांचे विरोधातील हा संप आहे.काही ग्राहकसेवेमुळे दुखावलेले असतील,काही वसुल्यामुळे नाराज असतील, पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे, तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी महत्वाची वस्तू आहे. ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार आणि कामगार कायम स्वरूपी उध्वस्थ झालेला असेल.त्याजागी कंत्राटी कामगार असेल.या सर्व बाजूचा गांभियाने विचार करून सर्व कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समिती द्वारे एकजूट दाखवत आहेत.जी आज पर्यंत रेल्वे,ओ.एन.जी.सी,एयरपोर्ट,बीएसएनएल,बँकवाले,अनेक कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या राष्ट्रीय ट्रेड युनियन महासंघांनी दाखविली नाही.ती विद्युत क्षेत्रातील कामगार दाखवत आहेत.म्हणूनच विद्युत ग्राहकांनी विद्युत कामगारांना साथ द्यावी.असे सागर तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने जाहीर आवाहन केले आहे.मागितल्याने मिळत नाही,संघर्षा शिवाय पर्याय नाही.संघटीत कामगारांनी असंघटीत कामगारावर अन्याय केला म्हणूनच कंत्राटी कामगार पद्धत निर्माण झाली.आता असंघटीत कंत्राटी कामगारांना पुढे करून संघटीत कामगारांचा संप मोडीत काढण्याचे धमकीचे,इशारा देणारे पत्रक कार्यकारी अभियंता द्वारे कंत्राटी कामगार पुरवठा करणाऱ्या बेरोजगार सेवा संस्थांना व कामगारंना दिला जात आहे.म्हणजेच पुन्हा संघटीत असंघटीत कंत्राटी कामगारात संघर्ष लावण्याचे षड्यंत्र उच्चवर्णीय उच्चपदस्थ पातळीवर रचले जाते.विद्युत ग्राहकांनी विद्युत कामगारांना साथ द्यावी.ग्राहक कामगार एकजुटीचा विजय झाला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.  

विशेष सूचना :- सोबत हे असंघटीत कंत्राटी कामगारांना त्या पुरवठा करणाऱ्यांना संस्थांना कसे धमकी किंवा इशारा पत्र दिले ते माहिती करिता देत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post